दिपालीची आत्महत्या नव्हे हत्याच...? "त्या" तरूण महिला अधिकाऱ्याचा तरफडून मृत्यु



अमरावती - अमरावती  जिल्ह्यातील मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल  राष्ट्रीय उद्यान अंतर्गत येणाऱ्या हरीसाल वन परीश्रेत्रात कार्यरत आर.एफ.ओ.  दिपाली चव्हाण या २८ वर्षीय तरूण महिला अधिकारीने शासकीय निवास स्थानी गोळी झाडून आत्महत्या केली.
 वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली हे सदर पत्रातुन दिसून येत आहे.त्यामुळे ही आत्महत्या नव्हे हत्याच आज असा आरोप होत आहे .या पत्रात एका dfo दर्जच्या अधिकारी यांच्या नावाचा देखील उल्लेख आहे त्यामुळे त्यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे .
दिपाली ने किती सोसलं असेल त्रास म्हणूनच काय ? एवढा तीने टोकाचा निर्णय घेतला असेल.या घटनेला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या "त्या" अधिकाऱ्यांमुळे शासनात काम करणाऱ्या लाखो महिलांची इभ्रत चव्हाटयावर आली आहे.
 या घटनेने शेकडो शंकाना जन्म दिला असून ही घटना घड़न्यासाठी ज्या वरिष्ठ अधिकारी मंडळीनी खतपानी घातले त्यांना शिक्षा होण्याची गरज आहे .
 ही घटना म्हणजे पुरोगामी महाराष्ट्र राज्याला काळीमा फासनारी ठरली आहे. 
डैशिंग आणि डेरिंगबाज असणाऱ्या दिपालीने गोळी झाडून आत्महत्या केली असली तरी तीच्या विभागातील अनेक अधिकारी हे मानायला तयार नाहीत की तीने आत्महत्या केली. तीची हत्याच झाली असा सुर वन विभागात उमटत आहे. 
नुकतेच व्हाट्सएपला व्हायरल झालेले पत्र चर्चेत आले हे पत्र प्रचंड धक्का देणारे आहे. त्या पत्रात तीला झालेल्या सर्व त्रासा विषयी तीने आपल्या अति वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले होते.वेळीच त्यांनी हस्तक्षेप केला असता तर आज दिपाली जीवंत राहिली असती.मात्र तसे झाले नाही. 

मुळची साताराची हुशार तरूणी दिपाली चव्हाण लोकसेवा आयोगाच्या महाराष्ट्र वन सेवा २०१४ परीक्षा उत्तीर्ण होऊन आर.एफ.ओ. (R.F.O.) पदी नियुक्ति मिळते. पहिलीच पोस्टिंग मेळघाटमध्ये ती पण अतिदुर्गम मागासलेल्या भागात. 
पहिल्याच नियुक्तिच ठिकाण म्हणजे धुळघाट नावातच सर्व काही आहे. 
जिथे माणस कामे करायला घाबरतात तिथे ही तरूण मुलगी आपली कर्तव्याची अमिट छाप उमटवते. तीच्या कामाची चर्चा होते, 
त्यातून तीला प्रोत्साहन मिळते. 
रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडते त्यातुन तीला "लेडी सिंघम" म्हणून नवी ओळख मिळते. 
कमालीचे डेरिंग आणि स्वभावाने हसमुख व आधुनिक विचारांच्या दिपाली आत्महत्या करुच शकत नाहीच असा अंदाज परिचीतांनी वर्तविला आहे. 
त्यानंतर ती हरिसाल वन परिक्षेत्राची धुरा सांभाळते. हरिसाल येथे रोरा, मांग्या व मालुर या तीन गावांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी भरीव कामगिरी केली होती. 
माणसांना लाजवेल अशीच तीची काहीशी कामगिरी होती.पण तीच्या कर्तबगारीला वरिष्ठ अधिकाऱ्यांची नजर लागते.
 तीची वेळोवेळी मुस्कटदाबी केली जाते,
 जिथे मिळेल तिथे डिवच न्याची एक संधी वरिष्ठ सोड़त नाही. महिला असल्याचा गैरफ़ायदा घेऊन तीची आडवनुक, पिळवनुक केली जाते. तरी बिचारी ते मुक़ाट्याने सहन करते तीला हे पण माहिती नसते की एक दिवस आपली मुस्कटदाबी जीव घेईल ,मॄत्युपूर्वी तीने लिहून ठेवलेली चिट्ठी मध्ये या बाबी नमूद आहेत अशी चर्चा आहे .त्या मुळेही घटना  अमानुषतेचा जनुकाही कळस गाठला आहे.
प्रेग्नेंसी असतांना वरिष्ठ अधिकारी मुलाहिजा न करताय तीला मालूर येथे कच्चा रस्त्यातून पायी फिरवतात. 
ज्यामुळे तीचे अबॉर्शन होते.एवढंच नव्हे तर तीला सुट्टी सुधा दिल्या जात नाही.तीचा पगार रोखुन धरला जातो असे आरोप होत आहे .याची सखोल चौकशी ची आता मागणी होत आहे .
नुकतेच ८ मार्चला जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला 
अन त्याच महिन्यात एक २८ वर्षाची तरूण आर.एफ.ओ. (R.F.O.) गोळी घालून आत्महत्या करते ही लाजीरवाणी गोष्ट आहे.
 दिपालीने केलेली ही आत्महत्या नाहीच, 
तीची हत्या झाली आहे त्याला जबाबदार असणारे सारेच वरिष्ठ अधिकारी यांना तुरुंगात डांबले पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने तीला न्याय मिळेल अन्यथा दिपालीसारख्या किती तरी राज्यातील कर्तबगार महीला अधिकाऱ्यांना महाराष्ट्र मुकनार आहे, 
याचा विचार केला गेला पाहिजे. 
याची दखल पर्यावरण प्रेमी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सो.घेतील आणि दिपालीला न्याय मिळवून देतील अशी आशा आहे.दिपालीला न्याय देण्यासाठी राज्य महिला आयोग,
एस.अय.डी. (S.I.D.), सी.आय.डी. (C.I.D.),  एन.आय.ए.(N.I.A.), ए.टी.एस.(ATS), सी.बी.आय. (C.B.I.), यु.ए.पी.ए.(U.A.P.A.) कायदा, एन.सी.बी. ( Narcotics Control Bureau Mumbai) आदि यंत्रणा सरकारने कामाला लावल्या पाहिजेत.यातील दोषी वरीष्ठ शासकीय  अधिकाऱ्यांना कठोरातील कठोर शिक्षा झालीच पाहिजे तरच भविष्यात कुठे ही अशी घटना घड़णार. नाहीत. व शासकीय महिला अधिकारी,कर्मचार्यांच्या वाट्याला कोणताही शासकीय अधिकारी जाणार नाहीत. 
त्यासाठी राज्यातील शासकीय व  निमशासकीय स्वयंमसेवी संस्थेतील महिला संघटनांनी देखील पुढाकार घेणे निंतांत फारच गरजेचे आहे. 
हरिसाल येथे रूजू झाल्यापासुन तीच्या मोबाईलचे सर्व रेकॉर्ड सी.डी.आर डाटा (CDR डाटा) तपासलेच गेले पाहिजेत. 
अशी मागणी होत आहे. त्या मुळे चौकशी नंतर ही हत्या की आत्महत्या याचे सत्य समोर येईलच अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने