काेराेनाची दुसरी लाट थाेपविण्यासाठी सज्ज व्हा! जिल्हा पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांची पाेलिस पाटील यांना सुचना!




      शिरपुर (प्रतिनिधी): काेराेनाच्या दुसऱ्या लाटेला सुरूवात झाली आहे. जिल्हाचा राेज ३०० ते ३५० रूग्णांचा आकडा आहे. तर दुसऱ्या लाटेचा प्रसार जलद गतीने हाेत आहे. संपुर्ण जगात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागात मास्क वापरण्याचे प्रमाण अल्प आहे. लग्न कार्यात काेराेनाचा जास्त प्रसार हाेत आहे. म्हणुन गर्दीच्या ठिकाणी कार्यवाही करा. तर सर्वांना स्वताच्या सुरक्षेसाठी मास्क वापरण्यासाठी जनजागृती करा. तर पन्नास पेक्षा जास्त वय असलेल्या लाेकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. ग्रामीण भागात पाेलिस पाटील महत्वाचा दुवा असुन त्यांना माेठी जबाबदारी आहे. तर कार्यवाही करण्यासाठी देखील अधिकार दिले आहेत. कुठल्याही परिस्थितीत काेराेनाची दुसरी लाट थाेपवायची आहे. अशी सुचना धुळे जिल्हा पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी पाेलिस पाटील यांना मार्गदर्शन करतांना दिली. 
        आज दि. १२ राेजी सकाळी ११ वाजता थाळनेर पाेलिस स्टेशन येथे जिल्हा पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांनी वार्षिक तपासणी निमित्ताने भेट दिली. यावेळी थाळनेर पाेलिस स्टेशन हद्दीतील पाेलिस पाटील यांची बैठक घेण्यात आली. यावेळी  अध्यक्षस्थानी जिल्हा पाेलिस अधिक्षक चिन्मय पंडीत तर व्यासपीठावर पाेलिस उपविभागीय अधिकारी शिरपुर श्री. अनिल माने, पाेलिस अधिक्षक यांचे राईटर श्री. प्रकाश पाटील, थाळनेर पाेलिस ठाण्याचे सहाय्यक पाेलिस निरीक्षक श्री. सचिन साळुंखे, पाेलिस उपनिरीक्षक श्री. नवनाथ रसाळ आदी उपस्थित हाेते. 
      यावेळी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पाेलिस पाटील संघटनेच्या वतीने धुळे जिल्हा अध्यक्ष छाेटुलाल पाटील ताेंदे, थाळनेर झाेन अध्यक्ष नितीन जाधव बभळाज, माेतीलाल परदेशी हिसाळे, जितेंद्र चाैधरी वाठाेडा, पाेलिस पाटील साै.सुरेखा जाधव भाेरटेक, साै. रुपाली बैसाणे मांजराेद यांनी मान्यवरांचा सत्कार केला. 
     यावेळी चिन्मय पंडीत यांनी पुढे बाेलतांना सांगितले की, मास्क वापरल्याने ७० टक्के संरक्षण मिळते. लाेकांना आता लाॅकडाऊन नकाे असेल तर काळजी घ्या! स्वताची काळजी स्वता घ्या! पाेलिस प्रशासन काम करीत आहे. तरी जबाबदार नागरिक म्हणुन आपली देखील काही कर्तव्य आहेत. जेष्ठ लाेकांना शक्य तेवढी लवकर लस टाेचुन घ्या असे श्री. चिन्मय पंडीत यांनी सांगितले. 
     याप्रसंगी हद्दीतील पाेलिस पाटील यांनी वेगवेगळ्या समस्या मांडल्या त्यात वेळेवर मानधन मिळावे. काेराेना लससाठी पाेलिस पाटील यांना प्राधान्य द्यावे. यासह विविध समस्या मांडल्या तर पाेलिस अधिक्षक यांनी समस्या लवकर मार्गी लावण्याची ग्वाही दिली. 
   कार्यक्रमाचे सुत्रसंचालन, प्रास्ताविक व आभार पिंप्रीचे पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी केले. तर कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पाेलिस कर्मचारी व पाेलिस पाटील बांधव यांनी परिश्रम घेतले. यावेळी पाेलिस पाटील बांधव माेठ्या संख्येने उपस्थित होते. 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने