श्री.खंडोबा पालखी सोहळा संपन्न



शिरपूर : येथील जागृत देवस्थान श्री.खंडेराव महाराज यांचा पालखी सोहळा दि.१० रोजी श्री.खंडेराव बाबा विकास संस्थेतर्फे आयोजित केला होता. यावेळी महाआरती कार्यक्रमासाठी शिरपूर पो.स्टे.चे पी.आय.हेमंत पाटील व त्यांचे सहकारी जाधव साहेब, पाटील साहेब, भा.ज.पा.माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, माजी जिल्हा कोषाध्यक्ष आबा धाकड, पत्रकार राजू मारवाडी, तरुण गर्जानाचे संपादक संतोष भोई, दै.तरुण भारत प्रतिनिधी मनोज भावसार, मोरे परिवार, श्री.खंडेराव बाबा विकास संस्थेचे सर्व पदाधिकारी व स्वयंसेवक उपस्थित होते. कोविड-१९ च्या नियमांचे पालक करीत, मास्क लावून व सुरक्षित अंतर ठेवून कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पी.आय.हेमंत पाटील यांनी ट्रस्टच्या कार्याबद्दल समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गोपाल मारवाडी, प्रास्ताविक कैलास धाकड तर आभार प्रदर्शन संजय आसापूरे यानी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ट्रस्टचे अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापूरे , सचिव गोपाल मारवाडी, विस्वस्त गुलाब भोई, श्रीहरी यादगिरीवार, जगदीश बारी, नाना सोनवणे, भानुदास मोरे, उत्तमराव मोरे, गोविंद मोरे, माधवराव मोरे, व्यवस्थापक महेश देवकर, अरविंद जाधव, राहूल जगदेव, पवन गोसावी, अशोक महाराज, मेहूल धाकड, अशिष धाकड, अजिंक्य धाकड, मुन्ना धाकड व भाविक उपस्थित होते. यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषात पालखी मिरवणूक मंदिरापासून निघत सर्व गावातून मिरवत पालखी विसर्जन मोरे परिवार यांच्या घरी करण्यात आले.

                                                       

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने