पथारे येथे आदीवासी बांधवाचा झाडे लावा, झाडे जगवा असा उपक्रम ५ वर्षांपासून खांद्यावर पाणी वाहून जगवले झाडे




दिग्विजयसिंग राजपुत
       शिंदखेडा तालुक्यातील पथारे येथील रहिवासी कायसिंग अर्जुन भिल यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकडी वर १५० ते २०० झाडे लावले आणि त्या झाडांना आज त्यांनी जगवून दाखवले आहेत त्या झाडांना ते ५०० मीटर अंतरावर असलेल्या विहिरीतून पाणी काढून झाडाला टाकतात ते स्वतःच्या घरचे काम करून रोज सकाळ संध्याकाळ जिवनातील अमूल्य वेळ काढून निसर्गासाठी देत असतात आदिवासी कुटुंबातील व्यक्ती असल्याने त्यांना मोलमजुरी केल्या शिवाय पर्याय नाही तरी ते मोलमजुरी करून देखील झाडांना पाणी टाकत आहे तर ही आदर्श देणारी बातमी आहे. झाडे लावा, झाडे जगवा हा उपक्रम त्यांनी २०१५ पासून सुरू केलेला आहे.
          कायसिंग भिल यांनी माध्यमिक विद्यालय रामी पथारे या संस्थेत १० वी पर्यंत शिक्षण घेतले आहे त्यांना देशभक्ती खुप आवडते त्यांच्या मुला बाळांवर जेवढे प्रेम करत नाही तेच्या पेक्षा जास्त पशूपक्षी व झाडेझुडपेंवर प्रेम करतात त्यांना दोन मुल आहेत त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाचे नाव भगतसिंग तर लाहन मुलाचे नाव चंद्रशेखर ठेवले आहे त्यांच्या सोबत चर्चा केली तेव्हा ते म्हटले की जसा आपला जीव आहे तसाच जीव झाडांना व प्रण्यांना देखील असतो ज्यावेळेस मी याठिकाणी झाडे लावले तेव्हा मला खुपच अडचणी आल्या लोक मला वेडा झाला आहे असे काय रिकामे काम करत आहे आपल्या घरचे काम धंदे कर असे म्हणू लागले यावेळी रामी पथारे परिसरातील अनेक तरूणांनी त्यांना मदत करण्याचे ठरविले व तरूणांनी आज त्या झाडांना पाणी देखील टाकले आणि आम्हांला जसा वेळ देता येईल तसा देत राहू असे तरुणांनी म्हटले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने