हरिद्वार-महाराष्टातील नाशिक जिल्ह्यातील हभप- निलेश महाराज बच्छाव,नाशिक जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राष्ट्रीय वारकरी परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख यांना हरिद्वार येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात दि-22/3/2021. रोजी अखिल भारतीय जुना आखाडा परिषद हरिद्वार येथील श्रीराम संस्कृती विश्वविद्यालय चे मठाधिपती 1008 महामंडलेश्वर डॉ.उमाकांतनंद सरस्वती यांनी हभप-निलेश महाराज बच्छाव यांना महंत पद घोषित केले.महाराष्टातील 27 किर्तनकारांना महंत पद बहाल करण्यात आले.यावेळी अखिल भारतीय जुना आखाडा परिषद हरिद्वार के श्रीराम संस्कृती विश्वविद्यालयाचे अध्यक्ष 1008 महामंडलेश्वर डॉ.उमाकांतनंद सरस्वती महाराज,महामडंलेश्वर वैदेही शरण दास जोधपुर, महंत हरिराम जातायत, महंत केशव दास शिवखेडा,महंत बालक दास महाराज उदरा फाटा,महंत नवल दास महाराज खोड,महंत श्रवणदास खोड व आधी करुन सर्व संत महंत उपस्थित होते.यावेळी सर्व सतत महंतांनी अभिनंदन केले.
Tags
news
