शिरपूर प्रतिनिधी - शेतकऱ्यांच्या वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा धुळे जिल्हा राष्ट्रीय जनमंच अपक्ष आंदोलन करेल या आशयाचे निवेदन आज जन्मंच पक्षातर्फे शिरपूर तहसीलदार यांना देण्यात आले आहे.
राज्यातील शेतकरीवर्ग सध्या प्रचंड अडचणीत आहे. एकतर वर्षभरापासुन कोरोनाचे संकट व त्यामुळे पडलेले बाजारभाव, त्यातच ऐन पिक हंगामाच्या काळात सर्वत्र झालेली अतिवृष्टी, यासाठी सरकारने जाहीर केलेली तुटपुंजी नुकसान भरपाई आणि ती सुद्धा मिळण्यास होत गेलेला विलंब.... यासर्व संकटांमुळे एक तर राज्यातील शेतकरी पहिलाच हवालदिल झालेला.... आणि त्यातच आता महावितरण कंपनीने कृषीपंपांच्या वीजबिलवसुलीचा लावलेला तगादा आणि त्याखातर वीजकनेक्षण कट करण्याचा लावलेला सपाटा यामुळे शेतकरी आणखीच संकटात सापडला आहे. पाणी उपलब्ध असुनही लाईट नसल्याने शेतक-यांची उभी पिके होरपळुन चालली आहेत. एकतर पहिलीच कृषीपंपाची आवास्तव बीलआकारणी सुरु आहे त्यातच या सरकारची वीजबिलमाफी तर सोडाच उलट कनेक्षण कट करण्याच्या धमकीमुळे शेतक-यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय होत आहे.
त्यामुळे सरकारने याकामी हस्तक्षेप करुन महावितरणची ही मनमानी थांबवावी अन्यथा राष्ट्रीय जनमंच पक्ष आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह शेतकरी वर्गाला घेऊन रस्त्यावर उतरेल असा इशारा पुणे येथे झालेल्या पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीत देण्यात आला असल्याची माहिती पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख भगवानराव
ज-हाड यांनी दिली.
शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर राष्ट्रीय जनमंच(सेक्युलर) पक्षाच्या राज्य कमिटीतील प्रमुख पदाधिका-यांची बैठक काल पुणे येथे झाली त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे यांना पक्षाने पाठवलेल्या पत्राद्वारे हा इशारा देण्यात आला.
पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अविनाशजी झेंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केलेल्या या राज्यस्तरीय बैठकीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. राधाकृष्ण बाचकर व राष्ट्रीय कार्याध्यक्ष इंजि. कैलास कोळसे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गिधाड, राज्याचे महासचिव भगवानराव ज-हाड, प्रदेश कोषाध्यक्ष प्रकाश थोरात, युवक प्रदेशाध्यक्ष सचिन देशमुख तसेच प्रदेश सचिव संदिप लांडगे या पदाधिका-यांनी शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर विचार मांडले.
तसेच कोरोना संकटामुळे मर्यादित उपस्थीती ठेऊन याच बैठकीत *व्हिडिओ काॅन्फरन्सींग* द्वारे राष्ट्रीय जनमंच चे राज्यातील काही प्रमुख पदाधिकारी... उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर सोनवणे सर, विदर्भ विभागाचे मुख्यसंघटक मिलिंद खैरकर, उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष प्रतापराव पवार आणि संघटक देविदास वाघ, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्ष सोमनाथ मोहिते
या सर्वांसोबत शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
या राज्यस्तरीय बैठकीत राज्यकमिटीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन शेतक-यांचे वीज कनेक्षण कट करु नयेत...शेतक-यांच्या कृषीपंपांचा विज पुरवठा सुरळीत करावा...विजबिलात सवलत किंवा ठराविक रकमेपर्यंत विजबिलमाफी करावी वगैरे प्रमुख मागण्या करण्यात आल्या.
तसेच सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या एक-दोन दिवसात संपुर्ण महाराष्ट्रभर वेगवेगळ्या जिल्हा व तालुक्यात त्या-त्या भागातील संबंधीत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात एकाच दिवशी सर्व ठिकाणी राष्ट्रीय जनमंच च्या जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय पदाधिकारी यांच्या वतीने विजकनेक्षण कट करु नये, विजपुरवठा सुरळीत करावा तसेच वीजबिल माफ करावे याच मागण्यांसाठी निवेदने देण्यात येणार आहेत.
आतापर्यंत राष्ट्रीय जनमंच(सेक्युलर) पक्ष सततच शेतक-यांच्या ज्वलंत प्रश्नांसाठी संघर्ष करत आला आहे. आणि याचाच एक भाग म्हणुन सध्या राज्यात शेतक-यावर कोसळलेले हे विजबिलाचे संकट दुर करणे व याकामी शेतक-यांची होत असलेली पिळवणुक थांबवणे हाच एकमेव उद्देश समोर ठेऊन राष्ट्रीय जनमंच(सेक्युलर) पक्ष मैदानात उतरला आहे.
ही शांततामय मार्गाने निवेदने देऊनही सरकारने यावर काहीच कृती केली नाही तर मग मात्र पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरुन राज्यभर आंदोलने केली जातील असा इशारा कालच्या पुणे येथील बैठकीत देण्यात आला.
पक्षाचे आदेशान्वये आज धुळे जिल्हा व शिरपूर तालुका च्या वतीने सदरचे निवेदन देण्यात आले आहे यावेळी राष्ट्रीय जनता पक्षाचे धुळे जिल्हा अध्यक्ष हिरालाल चौधरी मोहित चौधरी सुनिल मारवाडी शिंदे सर व कार्यकर्ते उपस्थित होते.
...............................
Tags
news
