दौंड - महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या वतीने राष्ट्रीय शाश्वत शेती अभियाना अंतर्गत जमीन आरोग्य पत्रिका प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन यवत येथे करण्यात आले होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्र बारामतीचे शास्त्रज्ञ डॉ. हनुमंत शेंडगे व डॉ. निलेश वास्टर यांनी माती परिक्षणाचे महत्त्व व नमुने कसे घ्यावे तसेच जिवाणू खताचे महत्त्व याबाबत माहिती दिली.
यावेळी प्रमुख वक्ते ऊस तज्ञ दयानंद बनसोडे यांनी उसत्पादनात वाढीसाठी आधुनिक तंत्रज्ञान, ठिबक सिंचन, खत व्यवस्थापन कीड व रोग व्यवस्थापन या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षणामध्ये जमीनीचे आरोग्य , सुपिकता वाढविण्यासाठी व टिकविणे, एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनाचा अवलंब करुन रासायनिक खतांबरोबरच सेंद्रिय खते, जैविक खते , सुक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्यांचा पुरवठा करणाऱ्या खतांचा वापर करणे, मातीचा नमुना कशा पद्धतीने घ्यावा याविषयी तज्ञांनी सविस्तर मार्गदर्शन शेतकरी यांना केले
यावेळी शेतकरी यांनी काही प्रश्न उपस्थित केले असता त्यावर देखील मार्गदर्शन करण्यात आले
यावेळी मंडळ कृषी अधिकारी स्वप्नील बनकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना शासकीय योजनेची माहिती दिली. सदर कार्यक्रमाला कृषी पर्यवेक्षक विनायक जगताप, कृषी सहाय्यक पंढरीनाथ कुतवळ, गणेश कदम, सविता ढोले, महेश पाटील, रेहान मुजावर, स्नेहल थेऊरकर, तसेच शेतकरी बचत गटाचे सदस्य, शेतकरी वर्ग उपस्थित होते
प्रतिनिधी
राहुलकुमार अवचट
Tags
news
