शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर शहरात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास बँकेतून काढलेले चार लाखांची रक्कम मोटरसायकलचा डिकीतून चोरी झाल्याची घटना समोर आली असून या बातमीची वार्ता पसरताच शहरात बाजारपेठेत विविध चर्चांना उधाण आले होते. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनेच्या माघ घेण्याचे व चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू केले. याबाबत सविस्तर वृत्त असे की आज दिनांक 20 मार्च रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास सुनील संतोष पाटील राहणार बाळदे तालुका शिरपूर जिल्हा धुळे यांनी शहरातील मेन रोडवरील बँक ऑफ इंडिया या बँकेच्या शाखेतून चार लाख रुपये रक्कम काढली व ती आपल्या मोटरसायकलच्या डिकीत ठेवून ते पाच कंदील परिसरात आले .यावेळेस त्यांनी मोटरसायकलची डिकी उघडून पाहिले असता त्यातील पैसे गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले ही बाब पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना फार मोठा मानसिक धक्का बसला आणि ते जागीच बेशुद्ध झाले. घटनास्थळी गर्दी झाल्यानंतर चोरी झाल्याची वार्ता पसरली पाटील यांना तात्काळ बस स्टँड जवळील माऊली हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी ताबडतोब शोध मोहीम सुरु करून तपास काम हाती घेतले बँक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज यातून काही धागेदोरे लागतात का यासाठी पोलीस शोध घेत होते. पुढील तपास शिरपूर शहर पोलिस स्टेशनचे पोलीस अधिकारी करत असून या घटनेमुळे मात्र काही काळ बाजारात तणाव पसरला होता .
शहरातील मेन रोडवर अशा प्रकारची घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते मात्र यामागील नेमके सत्य काय हे पोलिस तपास नंतरच समोर येईल मात्र याबाबत अशी घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात होते.
Tags
news
