आर. सी. पटेल महाविद्यालयातील पदवी व पद्‌व्युत्तर संगणक विभागातील विद्यार्थ्यांना सुवर्ण पदक




शिरपूर : येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित आर. सी. पटेल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील संगणक विभागातील विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2019-2020 च्या विद्यापीठ गुणवत्ता यादीत झळकले.
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने ऑक्टोबर 2020 मध्ये घेतलेल्या परीक्षाची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली. त्यात पद्‌व्युत्तर द्वितीय वर्ष संगणकशास्त्र विभागातील माधुरी रविंद्र बोरसे ही विद्यार्थिनी 9.75 ग्रेड (86.67 टक्के गुण) सह विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावून सुवर्ण पदक प्राप्त केले. तर संगणक विभागातील हर्षदा अशोक पाटील हिला 9.71 ग्रेड (85.96 टक्के गुण) मिळाले असून विद्यापीठात द्वितीय क्रमांक पटकावला.

पद्‌व्युत्तर वर्गातील संगणक विभागाचा निकाल 100 टक्के असून सातत्त्याने ह्या शैक्षणिक वर्षांत देखील सुवर्ण पदक पटकावले. तसेच पदवी विभागात तृतीय वर्ष संगणकशास्त्र विभागातील वैशाली साहेबराव सोनवणे ही विद्यार्थिनी 5.81 ग्रेड (92.26 टक्के गुण) ग्रेड सह विद्यापीठात प्रथम क्रमांक व सुवर्ण पदक पटकावले. 

गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी शिक्षण मंत्री आ. अमरिशभाई पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, सर्व संचालक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. आर. पाटील, उपप्राचार्य डॉ.ए.एम.पाटील, डॉ.आर.डी.जाधव, विभाग प्रमुख प्रा. बी. एस. पंचभाई यांनी कौतुक केले.

या यशासाठी संगणकशास्त्र विभागातील प्रा. बी. एस. पंचभाई, प्रा. एस. डी. मोने, प्रा. ए. जे. माहेश्वरी, प्रा. दिपक चव्हाण, प्रा. मेघा सोनवणे, प्रा.पुजा हजारे, प्रा. गीतांजली पाटील, गणेश सोनार, संजय मोरे, बन्सीलाल चौधरी, दशरथ पटेल, मेहुल गुजराथी, संदेश राजपूत यांचे मार्गदर्शन लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने