शिरपूर प्रतिनिधी - राजकारण आणि समाजकारण यांच्या वसा घेतलेले व मानव कल्याण चे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून कार्यरत असलेले राजकीय व सामाजिक संघटना मानव एकता पार्टी यांनी देशभरात आपल्या पक्षाच्या प्रचार प्रसार करण्यासाठी व सामान्य जनतेपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे व उद्दिष्ट पोहोचवण्यासाठी पक्षाच्या विस्तार करत असून याची सुरुवात आज दिनांक 2 मार्च रोजी शिरपूर शहरातून करण्यात आली . मानव एकटा पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजेश सुभाष जमादार यांनी शिरपूर तालुक्यातील बंजारा समाजाची बुलंद तोफ ओंकार आबा जाधव यांची आज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड जाहीर केली. शिवाय जिल्हा आणि तालुक्यातून विविध पदांवर पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. यावेळेस संस्थापक अध्यक्ष राजे सुभाष जमादार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भटेसिंह राजपूत व नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष ओंकार आबा जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
मानव एकता पार्टी राजकीय आणि सामाजिक संघटना असून राजकारण या सोबत समाजकारण करणे व मानव कल्याण करणे हे पक्षाचे प्रमुख ध्येय धोरण असून 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण करणारी संघटना आहे .सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी लढण्यासाठी देश पातळीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी व पक्षाच्या प्रचार आणि प्रसार करण्यासाठी सदरच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
शिवाय आगामी काळात शिरपूर शहराच्या विविध समस्या यांच्यासाठी पक्षाच्या माध्यमातून लढा देत सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार असल्याची भूमिका स्पष्ट केली व आगामी शिरपूर वरवाडे नगर परिषदेच्या निवडणुकीत मानव एकता पार्टी पूर्ण ताकदीनिशी सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढा देईल अशी ग्वाही देखील देण्यात आली. याच बरोबर तालुक्यातील विविध राजकीय सामाजिक प्रश्न सहकारी प्रकल्पांची अधोगती व सामान्य जनतेवर वरील होणारे अन्याय इत्यादीबाबत पक्ष सामान्यांसाठी जन संघर्ष उभा करेल असे देखील सांगण्यात आले.
यावेळी सदर कार्यक्रमासाठी मानव एकता पार्टीचे संस्थापक अध्यक्ष राजेश सुभाष जमादार ,नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष बाबासो ओंकार जाधव ,महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भटेसिंग राजपूत, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष एडवोकेट प्रवीण पाटील, राष्ट्रीय महासचिव कुवर कल्पेश सिंह राजपूत, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, तालुका अध्यक्ष राधेश्याम कोळी, शहराध्यक्ष संदीप पुजारी, कायदेशीर सल्लागार एडवोकेट विशाल मेटकर , ओंकार जाधव इत्यादी पदाधिकाऱ्यांसह मानव एकता पार्टीचे सदस्य या छोटेखानी कार्यक्रमास उपस्थित होते सदरचा कार्यक्रम राष्ट्रीय पातळीवरील नियुक्तीच्या असून देखील राज्यात सुरु असलेल्या कोरोणाच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर सदरचा कार्यक्रम हां कमीत कमी पदाधिकाऱ्यांनी समोर कोरोना नियमांचे पालन करतात संपन्न करण्यात आला .
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय मंडलिक यांनी केले व आभार प्रदर्शन मनोहर पाटील उपसरपंच अजनाड बंगला यांनी केले.
Tags
news
