शिरपुरात मिनी लॉक डाऊन वाढत्या संसर्गामुळे शिरपूर प्रशासनाचा निर्णय नियम पाळण्याचे आवाहन




शिरपूर - राज्यातील कोरणा चा वाढता प्रभाव व धुळे जिल्ह्य सह शिरपूर तालुक्यात कोरोना ची वाढती रुग्ण संख्या पाहता शिरपूर प्रशासनाने शिरपूर शहरात मिनी लॉक डाऊन जाहीर केला असून सर्व नागरिकांनी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करत नियमांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

 शिरपूर वरवाडे नगरपरिषद हद्दीतील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, शिरपूर परिसरातील कोरोना संक्रमणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे  दि. २१ मार्च २०२१ ते दि. ३१ मार्च २०२१ या कालावधीत शहरातील दवाखाने आणि मेडीकल स्टोअर्स वगळून सर्व आस्थापना सायंकाळी सहा ते सकाळी 8 वाजेपर्यंत  बंद करण्यात याव्यात. दूध विक्री सायंकाळी सात वाजेपर्यंत चालू राहतील. 
दि. ३१ मार्च पर्यंत आठवडे बाजार बंद राहील. 

सर्व नागरिक,  दुकानदार व भाजीपाला विक्रेते यांनी मास्क, सॅनीटायझर आणि सुरक्षित अंतर याबाबतचे नियम काटेकोर पणे पाळणे आवश्यक आहे. नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडनीय कारवाई करण्यात येईल. 
याची नोंद घ्यावी. 

- *प्रांताधिकारी, शिरपूर* 
*उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर* 
*तहसीलदार, शिरपूर* 
*पोलीस निरीक्षक, शिरपूर* 
*मुख्याधिकारी, शिरपूर*.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने