राजमाता अहिल्यादेवी यांच्या कार्याला उजाळा देत विशेष लेख.




श्री. प्रभाकर आडगाळे मालपुर ता.शिंदखेडा 

आज महाशिवरात्री हिंदू धर्मामध्ये प्रभू महादेवाला प्रथम स्थान आहे या पवित्र दिवसाच्या निमित्ताने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या संबंधात संदर्भातली छोटीशी माहिती आपल्याला शेअर करण्याचा प्रयत्न करतोय*
*परकीय आक्रमक करणाऱ्या राजांकडून हिंदू धर्म स्थळी नष्ट करण्याचा काम करण्याची भारतामध्ये करत असताना विशेष करून महादेवाच्या मंदिराला लक्ष केले गेले ती मंदिरे अनेक वर्षा जीर्णावस्थेत पडली होती पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या महादेवाचा भक्त यांच्या 32 वर्षाच्या राज्य कारभारामध्ये इ.स.सतराशे मध्ये  यांनी भारतामध्ये हजारो हिंदू मंदिरांची जीर्णोद्धार (पुनर बांधकाम ,प्राणप्रतिष्ठा) केलेली आहे त्यामध्ये बारा ज्योतिर्लिंगा चा ही समावेश आहे थोडक्यात एका मंदिरा विषयी आपणास माहिती देत आहोत* *परळी वैजनाथ येथील घुश्मेश्वर वैजनाथ या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 40000 रुपये त्यावेळी त्यांनी खर्च केले होते थोडक्यात सांगण्याचा अर्थ त्याकाळी सोन्याचा भाव शंभर रुपये तोळा असेल तर आपण सूज्ञ नागरिक आहात आताच्या काळात हिशोब केला तर एका मंदिराला त्यांनी किती खर्च केला आसावा? तळाच्या* *बाजारभावानुसार एका मंदिराला चार करोड रुपये खर्च पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी केला आहे*
*महाशिवरात्रीच्या निमित्ताने प्रभू शंकरांना नतमस्तक होऊन पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याला नमन करतो जय अहिल्या माता*

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने