शिरपूर टोल नाक्यावर टोल वसुलीचा घाव,पण नागरी सुविधांचा अभाव वीज बिल भरले नाही म्हणून पुरवठा खंडित, बिल भरा अन्यथा टोल परिसरात भीक माँगो आंदोलन




शिरपूर - मुंबई आग्रा राष्ट्रीय राजमार्ग क्रमांक 3 वर असलेल्या धुळे  पळासनेर टोल वे कंपनीच्या  भोंगळ कारभार वारंवार समोर येत आहे .शिरपूर शहरातील अनेक राजकीय पक्षांनी वारंवार निवेदने देऊन देखील कंपनीच्या कारभारात कोणतीही सुधारणा झालेली नाही .धुळे पळासनेर टोल रस्त्यांवर खड्डयांचे साम्राज्य उभे राहिले असून अनेकांना अपघाताचे बळी पडावे लागत आहे. मात्र कंपनीला यापासून काही देणे घेणे नसून फक्त सक्ततीची वसुली करणे हाच  जणू काही त्यांच्या मूलमंत्र आहे.
 कंपनीने टोल रोडवर सब कॉन्ट्रॅक्ट व काही टेंडर दिले आहेत त्यात देखील फार मोठा घोळ असल्याचा आरोप होत आहे. नियमानुसार टोल वसुली करीत असताना अनेक प्रकारच्या नागरी सुविधा देण्याची जबाबदारी ही टोल प्राधिकरणाची आहे. मात्र टोल प्राधिकरणाने आपले जबाबदारीपासून पळ काढल्याचे चित्र दिसत आहे .शिरपूर टोल प्लाझा अंतर्गत कार्यरत असलेल्या क्षेत्रात टोल कंपनीच्या नियोजनशून्य कारभार चालवला असून अनेक वेळा लाईट बिल देखील भरत नसल्याने विद्युत पुरवठा खंडित करण्याची वेळ येत असते. दहीवद गाव ते पळासनेर पर्यंत या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले असून अपघातांचे प्रमाणात देखील वाढ झाली आहे. टोल कंपनीने रस्त्यांवर तक्रार करण्यासाठी अपघात समय मदत मागण्यासाठी फोन नंबर चे फलक लावले आहेत मात्र यातील एकही क्रमांक अस्तित्वात नाही अथवा सुरू नाही अशा तक्रारी समोर येत आहेत. टोल रोडवर उड्डाणपूल अंडरपास अशा अनेक महत्त्वाच्या ठिकाणी हायवेवर लाईटची सुविधा अत्यावश्यक असते मात्र विज बिल न भरल्याने यांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले असून मागील आठवड्यात पासून चोपडा फाटा येथील उड्डाणपूल पासून दहिवद गावा पर्यंत रस्त्यावरील विद्युत पुरवठा बंद असून त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत .
अपघात समय देखील मदत कार्यात अनेक अडचणी निर्माण होत आहेत वरील सर्व समस्या सोडवण्यासाठी दहिवद परिसरातील युवकांनी टोल प्राधिकरणाला निवेदन सादर केले असून दोन दिवसाच्या आत लाईट बिल भरून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा व फोन बिल भरून कंट्रोल रूम व इतर नंबर सुरू करण्यात यावे शिवाय दहिवद पळासनेर अंतरावरील खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे .
सदर मागणीचे गांभीर्याने विचार न केल्यास टोल परिसरात भीक मांगो आंदोलन करून आपल्या टोलनाक्याचे बिल भरण्याकरिता आंदोलन केले जाईल व नागरिकांच्या व शासनाचे लक्ष वेधले जाईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन मयूर राजपूत, ईश्वर गवळी, जितेंद्र राजपूत ,राकेश चौधरी, दीपक पाटील, विजय सुर्यवंशी ,संभाजी गवळी, भीमा अहिरे, कैलास गोपाळ ,हितेश पाटील इत्यादी युवकांनी दिले आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने