दिल्ली येथील शेतकरी आंदोलनास पाठींबा देत विविध मागण्यांसाठी शिरपूरात सर्वपक्षीय आंदोलन

                


                                                                                                           शिरपूर : (प्रतिनिधी) अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय सिमितीच्या आवाहनानूसार दि. २६ रोजी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनाला चार महिने होत आहेत. तरी देखील केंद्र सरकार अन्नदात्याच्या तळतळात का घेत आहे? शेतकरी विरोधी कृषी कायदे अद्याप केंद्र सरकारने मागे घेतलेले नाहीत. म्हणून संपूर्ण देशभर शेतकरी केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधात संप्तत आहेत. म्हणून झोपेचे सोंग घेतलेल्या मोदी सरकारचे लक्ष वेधनेसाठी दि. २६ रोजी भारत बंदची हाक दिली आहे. त्याचाच भाग म्हणून शिरपूर तालुका किसान संघर्ष समन्वय समिती व सर्वपक्षा मार्फत शिरपूर येथील पाचकंदील चौकात किसान संघर्ष समन्वय समितीचे कार्यकर्ते सकाळी १० वाजता जमवून केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात निदर्शने केले. सोशल अंतर ठेवून पांच कंदीलपासून ते उपविभागीय कार्यालयापर्यत शांतात मार्गाने मोर्चा काढून निवेदन देण्यात आले. आंदोलनात विविध मागण्या करण्यात आल्या. शेतकरी विरोधी तिघे कृषी कायदे रद्द करा., स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करुन हमी भावाचा कायदा करा., कामगार विरोधी कायदा रद्द करा., विज विधेयक सन २०२० मागे घ्या.,कोरोना काळातील विज बील माफ करा व सकतीची वसूली थांबवून विज कनेक्शन खंडीत करु नका., शिरपूर वरवाडे नगर पालिकेने पाणी पट्टी कोरोना काळात रक्कम रु.१५०० वर पाणी पट्टीची आकारणी करू नये व व्यापारी गाळ्यांचे भाडे वाढ रद्द करावी., कृषी पंपधारक शेतकऱ्यांचे विज कनेक्शन खंडीत करू नये, शिरपुर शहरातील सामाजीक कार्यकर्ते हेमराज प्रकाशसिंग राजपूत यांच्यावर शिरपूर पोलीस स्टेशन येथे दाखल खोटे गुन्हे व म. उपविभागीय कार्यालय, शिरपुर येथे दाखल हद्दपारी प्रस्ताव रद्द करण्यात यावा., शिरपूर तहसिल कार्यालयात शेतकऱ्यांचे वाटणीचे ८५ प्रमाणेचे प्रकरणांना त्वरीत मंजूरी द्यावी. अश्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. निवेदनावर अॅड. हिरालाल परदेशी, धुळे जिल्हा किसान सभा अध्यक्ष., अॅड, संतोष पाटील, धुळे जिल्हा शेत मजूर युनियम अध्यक्ष., मनोहर पाटील, इंदिरा काँग्रेस पाटील, शिरपूर तालुका अध्यक्ष., रमेश करंकाळ, राष्ट्रवादी काँग्रेस पाटी, शिरपूर तालुका अध्यक्ष, अभिमन भोई, इंदिरा काँग्रेस पाटील, जिल्हा उपाध्यक्ष., भरतसिंग राजपूत, शिवसेना, जिल्हा उपप्रमुख., अत्तरसिंग समुद्रसिंग पावरा शिवसेना तालुका प्रमुख ,दिपक चोरमले, शिवसेना तालुका प्रमुख, मनोज धनगर, शिवसेना शहर अध्यक्ष, मोहन पाटील, शेतकरी विकास फाउंडेशन, शिरपूर अध्यक्ष., ईश्वर बोरसे प्रहार संघटना, तालुका अध्यक्ष, हेमराज राजपूत, सामाजीक कार्यकर्ता, प्रदिप चव्हाण बलकुवे सरपंच व सरचिटणीस रा.कॉ.पा, अर्जुन कोळी किसान सभा, डॉ.मनोज महाजन शहराध्यक्ष रा.कॉ.पा., उत्तमराव माळी शहराध्यक्ष काँग्रेस कमिटी, हिरालाल चौधरी जिल्हाध्यक्ष जनसेना पार्टी, दिनेश पाटील शिंगावे, युवराज राजपूत ता.उपाध्यक्ष रा.काँ.पा., संजय पाटील कार्याध्यक्ष रा.कॉ.पा., प्रेमकुमार चौधरी शहर संघटक, भुपेश पाटील रा.विद्यार्थी.कॉ.पा. शहराध्यक्ष यांच्या सह्या असून यावेळी मोठ्या प्रमाणावर शेतकरी, नागरीक सहभागी होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने