सर्वसामान्यांपर्यंत विकास कसा पोहोचेल यासाठी पटेल परिवाराचे सातत्याने प्रयत्न - आ. काशिराम पावरा,



आ. काशिराम पावरा, भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते चत्तरसिंग पाडा-पळासनेर रस्त्यावरील पूल निर्माण कार्याचा शुभारंभ


शिरपूर : माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, भूपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने शिरपूर तालुक्यात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विकासाची कामे सुरू आहेत. न थकता, अविरतपणे पटेल परिवार शिरपूर तालुक्याच्या विकासात मोठे योगदान देत असून तळागाळातील शेवटच्या माणसापर्यंत, सर्वसामान्यांपर्यंत विकास कसा पोहोचेल यासाठी ते सतत झटत असतात. शिरपूर तालुक्यात कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी बाळगून कामे केली जात आहेत असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी केले.

तालुक्याचे आमदार काशिराम पावरा व शिरपूर वरवाडे नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते जिल्हा परिषद अंतर्गत जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना योजनेतून चत्तरसिंग पाडा-पळासनेर रस्त्यावरील दोन ठिकाणी पूल निर्माण कार्याचा शुभारंभ शनिवारी दि. २७ फेब्रुवारी रोजी सकाळी करण्यात आला.

यावेळी आ. काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, भाजपा प्रदेशाध्यक्ष बबनराव चौधरी, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, माजी जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, शिरपूर साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी, बोराडी चे रमण भाऊसाहेब पावरा, माजी पंचायत समिती उपसभापती जगन टेलर, पंचायत समिती सदस्य मानसिंग पावरा, पळासनेर सरपंच सुरेश भिल, उपसरपंच सतीश वाणी, कमलेश जयस्वाल, माजी सरपंच मुखी पावरा, संजय गिरासे, देवीसिंग राजपूत, चेतनसिंग राजपूत, निलेशकुमार दुबे, शिरपूर पीपल्स बँक संचालक संजय चौधरी, जाकीर शेख, ग्राम विकास अधिकारी बोरसे, प्रवीण शर्मा, गोकुळ महाले, राजेश गिरासे, गुलाब पावरा, दिनेश पावरा, शंकर पावरा, नारायण पावरा, तेरसिंग पावरा, गंगाराम पावरा, ग्रामस्थ उपस्थित होते.

भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी यावेळी म्हणाले, भाईंच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्यात अनेक विकासकामे सुरू आहेत, त्यांनी केलेले अनेक आदर्श कामांमुळे शिरपूर तालुक्याचे नाव सर्वत्र आदराने व आनंदाने घेतले जाते हि अभिमानास्पद बाब आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व विविध ठिकाणी अनेक तरुण पदाधिकारी सक्रिय झाले असून ही आनंदाची बाब आहे.



प्रास्ताविकात शिरपूर साखर कारखाना संचालक जयवंत पाडवी यांनी सांगितले, कोरोना च्या पार्श्वभूमीवर अनेक कामे शासनाकडून प्रलंबित होती. परंतु माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशीराम पावरा  यांच्या पाठपुराव्यामुळे अनेक कामांना चालना मिळाली व अनेक विकासकामे सुरु झाली आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. सूत्रसंचलन रमण भाऊसाहेब पावरा यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने