शिरपूर : तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते श्री खंडेरावाची महाआरती करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिरपूरचा श्री. खंडोबा यात्रोत्सव रद्द असून मंदिर मात्र भाविकांना दर्शनासाठी खुले आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत व जागृत देवस्थान श्री. खंडेराव महाराज यांचा यात्रोत्सव सालाबादाप्रमाणे दि. २७/०२/२०२१ रोजी प्रारंभ होणार होता. परंतु, कोवीड-१९ मुळे जिल्हाधिकारी संजय यादव यांचे आदेशाने जिल्ह्यातील यात्रा, आनंदमेळा यांना परवानगी नाकारल्यामुळे यंदाचा यात्रोत्सव श्री. खंडेराव बाबा विकास संस्थे तर्फे रद्द करण्यात आला आहे.
माघ शुध्द पौर्णीमेला दि. २७/२/२०२१ रोजी महाआरतीचा कार्यक्रम सकाळी ठिक ९.१५ वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते व मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला. गर्दी वाढू नये याची दक्षता घेतली जात आहे. सोशल डिस्टनसिंग चे पालन करण्याबाबत मंदिर त्रस्त च्या वतीने दक्षता बाळगली जात आहे.
या वेळी महाआरतीचा कार्यक्रम प्रसंगी आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, भा.ज.पा. प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, महंत ह. भ. प. सतीषदास भोंगे महाराज, शिवसेनेचे राजू टेलर, भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. ध्रुवराज वाघ, पीएसआय मुरकुटे, वासुदेव देवरे, राजेश सोनवणे, शिवसेनेचे भरतसिंह राजपूत, शामकांत ईशी, राजेश मारवाडी, नगरसेवक, अनेक पदाधिकारी, भाविक उपस्थित होते.
यात्रेसाठी यात्रेस येणारे व्यावसायीक, भांडेवाले, मसालेवाले, खेळणी, पाळणे व अनेक मनोरंजनाची साधने तसेच हॉटेल व्यावसायिक, नारळ विक्रेते यांचा यात्रा रद्द झाल्यामुळे हिरमोड झाला आहे. यात्रेत होणारी लाखो रुपयांची उलाढाल या वर्षी ठप्प होणार आहे. तसेच मार्केट कमेटी मध्ये देखील पशुबाजारांत लाखो रुपयांची उलाढाल होणार नसल्याने व्यापाऱ्यांचा हिरमोड झाला आहे.
यात्रोत्सव रद्द झाला तरी श्री. खंडेराव महाराज देवस्थान दर्शनासाठी खुले राहणार आहे. मंदिरात हॉल मध्ये किंवा गाभाऱ्यात मास्क लावल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही. तसेच संस्थेतर्फे सॅनिटायजरची व्यवस्था, सॅनिटायजरची फवारणी व स्वच्छता राखली जात आहे. एका वेळी २५ ते ३० भाविकांना हॉल मध्ये प्रवेश देण्यात येत आहे, गर्दी होऊ नये व लोक एकत्र येऊ नये यासाठी बॅरीगेटीगची व्यवस्था संस्थेतर्फे करण्यात आली आहे व पूर्णपणे काळजी घेतली जात आहे.
कोरोना प्रार्दुभाव वाढु नये, संसर्ग वाढु नये यासाठी सर्व नागरीकांनी मास्क लावावा, हात स्वच्छ धुवावे, गर्दी करु नये, डिस्टसींग ठेवावी, गर्दीत जाण्याचे टाळावे तसेच मंदिरात येणाऱ्या भावीकांनी शिस्तीने व शांततेने दर्शन घ्यावे असे आवाहन श्री. खंडेराव बाबा विकास संस्थेचे अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, कोषाध्यक्ष किरण दलाल, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, सचिव गोपाल मारवाडी, प्रमुख विश्वस्त गुलाब भोई, श्रीहरी यादगीरीवार, गोपाल ठाकरे, शरद अग्रवाल, स्विकृत सदस्य भानुदास मोरे, गोविंदराव मोरे, नाना सोनवणे, गजानन मगरे, संजय बारी, जगदीश बारी, राजेंद्र धोबी, प्रकाश भोई, सुभाष भोई, अशोक राजपुत, संजय पाटील, पुजारी माधवराव मोरे, उत्तमराव मोरे, व्यवस्थापक महेश देवकर, अरविंद राजपूत यांनी केले आहे.
Tags
news
