शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात दिवसागणिक कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत असून उपजिल्हा रुग्णालय ,शिंगावे येथील कोरोना सेंटर व बोराडी येथील वैद्यकीय महाविद्यालय येथे कोरोना रुग्णांना आरोग्य सेवा देण्याच्या उपक्रम सुरू करून देखील व बेडची संख्या वाढवून देखील तालुक्यातील रुग्णांना आरोग्यसेवा मिळण्यात अडचणी निर्माण होत होत्या . आगामी काळात कोरोनाच्या संसर्ग अधिक प्रमाणात वाढू शकतो आणि त्यावेळेस कोणीही आरोग्य सेवेपासून वंचित राहू नये या दृष्टिकोनातून विचार विनिमय करून शिरपूर शहरातील डॉक्टरांच्या मदतीने व प्रशासनाच्या पुढाकाराने शहरात मुकेश भाई पटेल टाऊन हॉल , करवंद नाका येथे आज दिनांक 28 मार्च सकाळी 11 वा .शहरात जम्बो कोव्हिडं सेंटरची सुरुवात करण्यात आली. सदरचा उपक्रम शासनाकडून मान्यता मिळवून घेण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष तुषारजी रंध्ये यांनी विशेष प्रयत्न केले व यास जिल्हाधिकारी यांची परवानगी घेऊन शासन मान्य दरात रुग्णसेवेचे हे दालन सुरू करण्यात आले. सदर ठिकाणी सध्या वीस बेडची सोय उपलब्ध असून लवकरच गरजेनुसार व क्षमतेनुसार बेड संख्या वाढवण्यात येणार आहे व रुग्णांना आवश्यक त्या सर्व सेवा या ठिकाणी पुरवल्या जाणार आहेत .सदरचा उपक्रम आरोग्य सेवेच्या दृष्टीने सुरू करण्यात आला असून या ठिकाणी शासनाने निर्धारित केलेल्या दरातच आरोग्य सेवा पुरवल्या जाणार आहेत शिवाय कोणतेही वैद्यकीय बिल मंजुरीसाठी यासाठी प्रांताधिकारी शिरपूर व नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी नोडल अधिकारी ची नेमणूक करत असून नोडल अधिकारी यांच्या मान्यता नंतरच बिल आकारले जाणार आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी या जम्बो कोविड सेंटरच्या आरोग्य सेवेसाठी लाभ लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे .
सदर जम्बो कोव्हीड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी उपविभागीय अधिकारी विक्रम सिंह बादल ,उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अमोल बागुल ,तहसीलदार आबा महाजन, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुषार जी रंध्ये, डॉक्टर क्लब चे अध्यक्ष डॉक्टर सचिन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सदरचा उपक्रम सुरू करण्यासाठी शिरपूर शहरातील डॉ. अमित गुजराती, डॉ. पराग पाटील, डॉ. अतुल बडगुजर, डॉ. सुदिप सिसोदे,डॉ.गुंजन पाटील, डॉ. विजय अग्रवाल इत्यादी डॉक्टरांनी प्रयत्न केले असून .सदरचे डॉक्टर या ठिकाणी आरोग्य सेवा देणार आहेत.त्यांना शिरपूर प्रशासन व शिरपूर नगरपरिषदेचे सहकार्य लाभले आहे. माननीय भूपेशभाई पटेल यांनी देखील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी या हेतूने सदरची जागा उपलब्ध करून दिले आहे.तरी गरजुनी या आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Tags
news
