शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून छापा टाकून कारवाई केली असता शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडी शिवारातील सलाई पाडा या भागात रस्त्यालगत कुडाच्या झोपडीत छापा टाकला असता सदर ठिकाणी अवैद्य विनापरवाना शुद्ध माध्यर्क स्पिरिट साठा मिळून आला. सदरची कारवाई दिनांक 26 मार्च रोजी करण्यात आली सदर साठ्याच्या मूळ मालक फरार झाला आहे .
सदरच्या कारवाईत 1 लाख 32 हजार रुपये किमतीचे स्पिरिट के भरलेले12 ड्रम, 6 हजार रुपये किमतीचे 200 लिटर क्षमतेचे ड्रम ,2 हजार रुपये किमतीचे प्लास्टिक ड्रम असा एकूण 1 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त के.बी . उमाप मुंबई" संचालक श्रीमती उषा वर्मा मुंबई, विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोड नाशिक, अधीक्षक संजय पाटील धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली एम. पी .पवार दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क शिरपूर, निरीक्षक ए. यु. सूर्यवंशी, दुय्यम निरीक्षक प्रशांत दळवी, तुषार देशमुख ,किशोर गायकवाड, एस एस गोवेकर ,ए बी निकुंभ, एस. एस. देवरे,के.डी वराळे, गोरख पाटील, चैतन्य जाधव, भाऊसाहेब पाटील, दारासिंग पावरा, रवींद्र देसले इत्यादींच्या पथकाने केली आहे.
Tags
news
