शिरपूर प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्यात मागील एक वर्षांपासून कोरोना आजाराने संसर्ग पसरवला असून त्यामुळे राज्यातील जनतेचे व शेतकऱ्यांचे अर्थचक्र थांबले असून शेतकरी आर्थिक अडचणीत आहे .वारंवार होणारे लॉकडाउन संचार बंदी व जनता कर्फ्यू यामुळे देखील व्यापाऱ्यांचे व सामान्य नागरिकांचे आर्थिक नुकसान झाले असून अनेकांनी आपले रोजगार गमावले आहेत. मात्र या सर्व वीज ग्राहकांची वीज मंडळाकडून व महाराष्ट्र शासनाकडून उपेक्षा होत असून त्यांना आलेले वाढीव वीज बिल कमी न करता आहे त्या परिस्थितीत वीज बिल भरण्यास सक्ती करण्यात येत आहे. मात्र ज्यांची आर्थिक परिस्थिती तेच नाही अशा सामान्य नागरिकांचे शेतकर्यांचे वीज कनेक्शन कट केले जात आहेत हे करत असतांना कोणतीही पूर्वसूचना न देता मनमानी पद्धतीने कामकाज करून वीज मंडळ वीज ग्राहकांचे व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट करत आहे. सदरची बाब ही अन्यायकारक असून यापुढे कोणत्याही सामान्य नागरिकांचे व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन या पुढे कट करू नये अशी विनंती मानव एकता पार्टी यांचेकडून करण्यात आले आहे .शिवाय ज्या ग्राहकांचे व शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कट केले आहे त्यांचे वीज कनेक्शन तातडीने पूर्ववत करण्यात यावे अशी देखील मागणी या निवेदनातून करण्यात आले आली आहे. धुळे जिल्ह्यात मागील काळात कोरोना बरोबरच अवकाळी पाऊस ,अतिवृष्टी, यामुळे देखील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचा विचार करता वीज मंडळाने वरील मागण्यांची पूर्तता करावी व नागरिकांना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली असून जर ह्यापुढेही वीज मंडळाने वीज कनेक्शन कट करणे व ते पूर्ववत न करणे हा कार्यक्रम राबवला तर मानव एकता पार्टी यांच्या जाहीर निषेध करून लाक्षणिक उपोषण व रास्ता रोको सारखे आंदोलन उभे करेल हो यानंतर होणारे सर्व परिणामास महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी जबाबदार असेल याची नोंद घ्यावी असे देखील निवेदनात नमूद केले आहे.
सदरच्या निवेदनावर मानव एकता पार्टी चे संस्थापक अध्यक्ष राजे सुभाषजी जमादार, राष्ट्रीय अध्यक्ष ओंकार आबा जाधव, राष्ट्रीय महासचिव कल्पेश सिंह राजपूत ,राष्ट्रीय संघटक ओंकार नाना जाधव ,धुळे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील ,तालुका सदस्य राधेशाम बंजारा, तालुका संघटक देविदास बंजारा, संतोष आहिरे ,तन्मय पाटील, हिंमत राजपूत ,परेश वाघ इत्यादी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
Tags
news
