तोंदे गावात गटविकास अधिकारी यांची भेट, आरोग्य सेवा व उपाय योजना करत माझे दुकान माझी जबाबदारी ही संकल्पना राबवत गावकऱ्यांना केले मार्गदर्शन




शिरपूर प्रतिनिधी - शिरपूर तालुक्यात कोरीना चा  संसर्ग दुसऱ्या टप्प्यात देखील मोठ्या प्रमाणावर वाढत असून तालुक्यातील कोरोना रुग्णांच्या संसर्गात दिवसेंदिवस वाढ होत आहे. तालुक्यातील चोपडा रोडवर असलेल्या तोंदे गावात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून  3 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे .



 गावात आरोग्य सेवेवर भर देत कोरोना चाचण्या वाढऊन व रुग्णांना योग्य ती आरोग्य सेवा मिळावी म्हणून उपाय योजना करण्यासाठी अचानक शिरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाय. डी. शिंदे यांनी तातडीने आज दिनांक 29 रोजी तोंदे गावाला अधिकाऱ्यांच्या सोबत भेट देऊन गावातील परिस्थितीचा आढावा घेतला.
  ग्राम स्तरीय समिती सदस्याची व अध्यक्ष, सचिव यांची सभा आयोजित केली त्या सभेस उपस्थित सरपंच, उप सरपंच, व स.मा .जिल्हा परिषद सदस्य, , पोलिस पाटील, तलाठी, ग्राम सेवक, अंगणवाडी सेविका, आशा वकॅसॅ, व विकास  सोसायटीचे चेअरमन, यांना मार्गदर्शन करत  मा.मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांच्या संकल्पने तुन "माझे दुकान माझी जबाबदारी " हे अभियान मधील 10 सूत्री कार्यक्रम राबविण्या बाबत मार्गदर्शन करून अधिकाऱ्यांना कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. 
तसेच  आजच्या गावातील  तपासणीत 83 पैकी कोरोना Positive पेशंट 11 आल्याने गट विकास अधिकारी पं स शिरपूर व विस्तार अधिकारी गाम पंचायत यांनी व अधिकारी यांनी कोरोना Positive पेशंट असलेल्या गल्ली व घराला बाधित क्षेञ म्हणून बाधित क्षेञाचे बोडॅ ( स्टीकर ) लावले . शासनाने निर्धारित केलेले कोरोना प्रतिबंधक नियम पाडण्याचे गावकऱ्यांना आवाहन केले.
 माननीय जिल्हाधिकारी सो धुळे व मुख्य कार्यकारी अधिकारी सौ जिल्हा परिषद धुळे यांच्या आदेशान्वये माझे दुकान माझी जबाबदारी या अभियान अंतर्गत सूचना देऊन या अभियानाबाबत माहिती दिली दुकानदाराने सुद्धा प्रत्येकाने मास्क लावून व प्रत्येक ग्राहकाला मास्क लावण्याचे बंधनकारक करून कोणत्याही प्रकारे गर्दी न करता उपाययोजना करण्याचे सूचना दिल्या .शिवाय लग्नकार्यात 50 पेक्षा अधिक व्यक्तींना व अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक व्यक्तींना शासनाने परवानगी नाकारली असून नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे देखील इशारा यावेळी देण्यात आला.गावातील सद्यस्थितीत व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवला आहे.
यावेळी गटविकास अधिकारी वाय डी शिंदे जिल्हा परिषद सदस्य श्रीमती बेबीबाई पावरा उपसरपंच श्रीमती उज्ज्वला अनिल पाटील सरपंच श्रीमती मंगला बाई संतोष आहिरे विस्तार अधिकारी ग्रामपंचायत आर झेड मोरे विकास सोसायटीचे चेअरमन अनिल शालिग्राम पाटील पोलीस पाटील छोटूलाल जगन्नाथ पाटील तलाठी सानप ग्रामसेवक पेंढारकर अंगणवाडी सेविका व आशा वर्कर इत्यादी या वेळेस उपस्थित होते.



 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने