मानव एकता पार्टी चा कार्यकर्ता मार्गदर्शन व जन संपर्क अभियानास सुरुवात




शिरपूर प्रतिनिधी -  मानव एकता पार्टीने महाराष्ट्र राज्यात आपल्या पक्षाच्या प्रचार आणि प्रसार करण्यास सुरूवात केली असून पक्षाने नुकतीच विविध पदांवर नियुक्त्या जाहीर केले असून राष्ट्रीय अध्यक्षपदी देखील निवड जाहीर केली आहे.
 पक्षाने शिरपूर तालुक्यातून आपला पाया मजबूत करण्याचे धोरण ठरवले असून मानव एकता पार्टीचे तालुक्यात व जिल्ह्यात व महाराष्ट्र राज्यात सदस्य नोंदणी अभियान सुरू केले असून या अभियानाच्या मार्गदर्शनासाठी  पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओंकार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहरातील हॉटेल खानदेशी तडका याठिकाणी दिनांक 9 मार्च रोजी एक छोटेखानी कार्यकर्ता बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना गाव तिथे शाखा तयार करून पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आपल्या स्तरावर सभासद नोंदणी करावी व तालुक्यात पक्षाची राजकीय ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन करण्यात आले. धुळे जिल्ह्यात सध्या कोरोना चा प्रसार  मोठ्या प्रमाणावर होत असल्यामुळे कार्यकर्त्यांनी कोणताही लवाजमा न करता वैयक्तिक रित्या कार्य करत पक्षाची ध्येयधोरणे व उद्दिष्ट आपल्या सदस्यांपर्यंत पोहोचवावी व कोरोना नियमांचे पालन करून पक्षाचे काम करावे ही देखील या वेळेस मार्गदर्शन करण्यात आले. सदर प्रसंगी मानव एकता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ओंकार आबा जाधव, राष्ट्रीय संयोजक ओंकार जाधव, धुळे जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, शिरपूर तालुका अध्यक्ष राधेश्याम कोळी, शिरपूर तालुका उपाध्यक्ष प्रकाश शेटे,युवा शहराध्यक्ष म्हणून मनोज बोरसे, शिरपूर शहराध्यक्ष संदीप महानुभाव , भगतसिंग नगर शाखा अध्यक्ष भिकन मराठे वाघाडी शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर मराठे, वाघाडी शाखा सचिव जितेंद्र मराठे ,इदगाव नगर शाखा अध्यक्ष शाहीद  शेख इत्यादी यावेळी उपस्थित होते.
 

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने