धुळे जिल्ह्यातील सगळ्यात कमी वयाचे
बळसाने ग्रामपंचायतीचे उपसरपंच पदी शिवसेनेचे महावीर जैन यांची बिनविरोध निवड
बळसाणे : साक्री तालुक्यातील बळसाणे येथील उपसरपंच निवडकरिता येथील लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीत रिक्त झालेल्या जागेवर महावीर जैन यांची एकमताने निवड करण्यात आली
जैन यांच्या निवडीमुळे बळसाणे गावात प्रथमतः च मानाचे स्थान प्राप्त झाल्याने जैन समाजासह ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे
तत्कालीन उपसरपंच सौ.जन्याबाई मासुळे यांचा एक वर्षाचा कार्यकाळ पुर्ण झाल्याने त्यांनी पदाचा राजीनामा देत रिक्त झालेल्या जागेसाठी शिवसेनेचे महावीर जैन यांचे एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा ग्रामसेवक ए.टी. कुवर यांनी याप्रसंगी जाहीर केले.
यावेळी महावीर जैन यांनी सांगितले की, गावाचा विकासासाठी कोणत्याही परिस्थितीत विकास निधी उपलब्ध करून गावाचा विकास करणार गावात बंदीस्त गटार,अमरधाम येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पूर्ण डिजिटल करणे, आरोग्य उपकेंद्र येथे लक्ष घालने, गावात नवीन योजना राबविणार हे सगळे काम लोकनियुक्त सरपंच दरबारसिंग गिरासे यांच्या मार्गदर्शनाखाली करणार असे सांगितले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य ध्यानाबाई माळचे,कल्पना ईशी , मलिखा पठाण , महावीर जैन , देविदास धनुरे , अवचित धनगर , महादु पाटील , इंद्रसिंग गिरासे , प्रा.भुषण हालोरे , शायसिंग मोरे यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच महावीर जैन यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले.
Tags
news
