शिरपूर : श्री रामाच्या जयघोषात शिरपूर शहरात श्री राम मंदिर निधी समर्पण अभियान समिती शिरपूर तर्फे मंदिर निर्माण कार्यासाठी असंख्य रामभक्त, तालुक्यातील भाविक, बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
श्री राम जय राम जय जय राम, श्री रामाचा जयघोष करत, श्री राम गीत सांघिक पद्य गायन करत आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या भव्य प्रांगणात बुधवार दि. ३ फेब्रुवारी रोजी तालुक्यातील भक्तगण यांच्यासाठी कार्यक्रम घेण्यात आला. सुरुवातीला प्रभू श्री राम प्रतिमा पूजन तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, नंदूजी गिरजे (संभाजी नगर, 1996 पासून पूर्ण वेळ प्रचारक), आर. एस. एस. चे जिल्हा कार्यवाह राजेश पाटील, आर. एस. एस. चे शिरपूर तालुका कार्यवाह जितेंद्र पाटील, जिल्हा सदभाव प्रमुख संजय पाटील हे व्यासपीठावर उपस्थित होते.
आमदार काशिराम पावरा यांनी यावेळी श्री रामाच्या जयघोषात भाषणाची सुरुवात केली. ते म्हणाले, अयोध्येत राम मंदिर पूर्णत्वाकडे येण्यासाठी आपले योगदान देण्यासाठी मंदिर कार्यासाठी आपल्याला संधी चालून आली आहे. रामाची शिकवण आपण सर्वांनी अंगीकारू या, श्रीराम यांच्या परिवरासारखे जीवन आपण सर्वांनी जगण्याचा प्रयत्न करू या. अनेक साधू संत महापुरुष यांनी लढा दिल्याने मंदिरे व आपला देश आपल्या समोर उभा आहे. मंदिर कार्यात सर्वसामान्य, गोरगरीब जनतेचे योगदान यात असणार आहे. पक्षभेद विसरून सेवा करावी, तन मन धन यापैकी जे शक्य आहे त्यानुसार काम करु या, प्रभू रामचंद्र कार्यात वाहून घेऊ या. आपण सर्व भाग्यवान आहोत, आपल्यासमोर मंदिर निर्माण कार्य होतेय. नुसते नाव न घेता शरीरात राम धारण करु या व सर्वांच्या सेवेसाठी प्रयत्न करु या. माजी मंत्री अमरिशभाई पटेल, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल या परिवाराचा मोठा सहभाग असून सर्वांनी आपल्या परीने मंदिर कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन आमदार काशिराम पावरा यांनी केले.
कार्यक्रमाला भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, साखर कारखाना चेअरमन माधवराव पाटील, पंचायत समिती सभापती सत्तारसिंग पावरा, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, भाजपा माजी तालुकाध्यक्ष राहुल रंधे, ऍड. महेश वाघ, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी, भाजपा पदाधिकारी, आर. एस. एस., वि. हि. प., बजरंग दल, अ. भा. वि. प., अधिवक्ता परिषद, शिक्षक परिषद, भारतीय किसान संघ, गो रक्षा परिषद यांचे पदाधिकारी, सर्व स्वयंसेवक, शहरातील व तालुक्यातील भक्तगण, पदाधिकारी, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुल व किसान विद्या प्रसारक संस्थेचे शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आर. एस. एस. चे जिल्हा कार्यवाह राजेश पाटील यांनी उपस्थित सर्वांना सविस्तर विवेचन करुन मार्गदर्शन करतांना म्हणाले, वंदनीय मातेच्या जयघोषाने, जय श्री रामाच्या जयघोषात देशभरात उत्साहात मंदिर कार्याला प्रारंभ झाला आहे. देेशात भक्तांनी आजपर्यंत स्वतःहून कोणालाही डिवचण्याचे काम केले नाही, सर्वांच्या सहभागातून हे राम मंदिर राष्ट्र मंदिर व्हावे. भारतीय संस्कृतीचे काम होतेय. आपल्या देशाचा, धर्माचा इतिहास टिकविण्यासाठी प्रयत्न व्हावे. अनेक देश स्वतःची संस्कृती विसरले आहेत. शेकडो वर्षे अनेक संकटे झेलून भारत देशच जगात आहे की, ते भारतीय संस्कृती चे जतन कायम कर आहे. प्रभू श्री रामाचे नाव गेल्या दहा हजार वर्षांपासून प्रत्येकाच्या मनात आहे, असंख्य वयोवृद्ध महिला, पुरुष तरुण हे मंदिर निर्माण कार्यात योगदान देण्यासाठी आतुर झाले आहेत. भारत परमेश्वरांची भूमी आहे, राम अवताराचे विशेष महत्त्व आहे, राम हे प्रत्येकाला स्नेहभाव देणारे महापुरुष म्हणून जीवन व्यतीत केले. त्यांनी अनेक साधू संत यांच्या यज्ञ कार्यात संरक्षणाची भूमिका बजावली. देशात संस्कारक्षम पिढी निर्माण करण्यासाठी आपण तरुणांना देव देवता यांच्या पराक्रमांच्या गौरव गाथा सांगाव्या, मानवी जीवन कसे जगावे याचेे मार्गदर्शन करावे.
आपल्या देशासाठी व श्री राम मंदिर कार्यात पूर्वी अनेक साधू संत, महापुरुष यांनी आपले बलिदान दिले. आपले सत्व सोडू नका, आपले अस्तित्त्व विसरू नका. जगात सर्वात जास्त ग्रंथ विविध भाषेत रामायण हेच आहे. रामभक्त हे देवासाठी वर्गणी घेतात, परंतु काही नतद्रष्ट खंडणी गोळा करून संभ्रम निर्माण करताहेत, त्यांच्यापासून सावध रहा. पहिले उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी सोमनाथ मंदिर जीर्णोद्धार करून अखंडित देशासाठी कार्य करण्याचे देशाला आवाहन केले होते. भारतीय संस्कृतीचे जतन करा. अपवित्र, भेदभाव अशा बाबींना थारा नाही. खारुताईची नोंद झाल्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही, म्हणून आपण सर्वांनी मंदिर कार्यात सहभाग नोंदवावा. अनेक वर्षांच्या गुलामीमुळे अनेक गुणदोष आपल्यात आले. 482 वर्षांपूर्वीची राम जन्मभूमी आपल्याला परत मिळाली, आपले परत मिळविण्यासाठी आपण लढलो, आपल्याला स्वतःचेच अस्तित्व पाहिजे, चिंतन करून मार्गक्रमण करु या, श्रीराम मंदिर कार्यासाठी दान नकोय, निधी समर्पण करायचे आहे.
यावेळी प्रास्ताविकात आर. एस. एस. चे शिरपूर तालुका कार्यवाह जितेंद्र पाटील म्हणाले,देशभरात अभियानाचा
आज 20 वा दिवस आहे. 5 ऑगस्ट 2020 रोजी अयोध्येत श्री राम मंदिर भूमिपूजन करण्यात आले. श्री राम मंदिर कार्यात प्रत्येक नागरिकांचा सहभाग असावा,
श्री राम मंदिर कार्यात सर्वच जण आपले योगदान देऊ इच्छित आहेत. देशभरात प्रचार, प्रसार कार्य सुरु झाले आहे, अनेक प्रेरणादायी अनुभव येत आहेत. माता, भगिनी, भक्तगण सर्वांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. शबरी मातेची निस्सीम भक्ती आपण पाहिली आहे, अशा अनेक भक्त माता समाजात आहेत. सर्वांनी मंदिर कार्यात योगदान द्यावे. शिरपूर शहरात बस स्टँड समोर श्रीराम मंदिर समर्पण निधी जमा करावा.
Tags
news
