*दोंडाईचा वि.प्र.* हस्ती चॅरिटेबल ट्रस्ट संचलीत, हस्ती पब्लिक स्कूल अँड ज्यु. कॉलेज दोंडाईचा आणि धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांचे संयुक्त विद्यमाने व शालेय समिती चेअरमन कैलास जैन यांचे मार्गदर्शनाने दि. ९ फेब्रुवारी २०२१ मंगळवार रोजी दु. ३:०० वा. हस्ती स्पोर्टस् अकॅडमी मैदान, रिलायन्स पेट्रोल पंप शेजारी - दोंडाईचा येथे १९ वर्ष आतील ज्यु. गट धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघासाठी खेळाडूंच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरच्या निवड चाचणी द्वारा निवड झालेला धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट संघ आगामी औरंगाबाद येथे दि. १९ ते २१ फेब्रुवारी २०२१ दरम्यान संपन्न होणाऱ्या १९ वर्ष आतील ज्यु. गट - राज्यस्तर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत सहभागी होणार आहे. तरी धुळे जिल्ह्यातील टेनिस बॉल क्रिकेट खेळांडूंनी गणवेषात व स्वत:च्या बॅट सह निवड चाचणीकरिता बहुसंख्येने उपस्थित राहून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा. असे आवाहन धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष कैलास जैन यांनी केले आहे.
सदर निवड चाचणीच्या अधिक माहितीसाठी धुळे जिल्हा टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन सचिव विशाल पवार ७३८७७११८७३ व सह-सचिव विलास पाटिल यांचेशी संपर्क साधावा.
Tags
news
