पटेल परिवारा तर्फे मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्टच्या वतीने रुमालपाडा गावात ब्लॅंकेट वाटप




शिरपूर : मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्टच्या वतीने हाडाखेड गावाजवळ रुमालपाडा गावात ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल यांनी शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात जाऊन आदिवासी भगिनी तसेच अनेक युवती, बंधू, भगिनी यांच्याशी प्रत्यक्ष संपर्क साधून दि. ७ फेब्रुवारी रविवार रोजी ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.
यावेळी आमदार काशीराम पावरा, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल, सौ. कृतिबेन भूपेशभाई पटेल यांच्या हस्ते ब्लॅंकेटचे वाटप झाले.

यावेळी अशोक कलाल, रुमालपाडा गावाचे सरपंच सुरेश पावरा, मनसाराम पावरा, रोहिदास गोपाळ, ग्रामस्थ, महिला, युुवती, युवक उपस्थित होते. यापुढे देखील अनेक ठिकाणी ब्लॅंकेटचे वाटप केले जाणार आहे.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली सातत्याने सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात.

मुकेशभाई पटेल चॅरेटिबल ट्रस्टच्या माध्यमातून समाज सेवेचे व्रत हाती घेण्यात आले आहे. आदिवासी बंधू-भगिनी यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आमदार काशीराम पावरा यांनी आदिवासी बांधवांशी एकरूप असलेल्या पटेल परिवाराला लाख लाख धन्यवाद देऊन पटेल परिवाराचे कार्य आदर्शवत व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने