विखरन गावात शिवजयंती निमित्ताने शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला त्यात दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले त्यात सकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने शासकीय पद्धतीने गावातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आई अहिल्यादेवी होळकर स्मारकास पुष्पहार अर्पण करून नारळ वाढवण्यात आला तसेच गावातील प्रवेशद्वाराजवळ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस सर्व तरुणांच्या वतीने पुष्पहार व श्रीफळ बांधण्यात आले यानंतर शासनाकडून कोव्हिड 19 चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मिरवणुकीचे आयोजन रद्द करण्यात आले होते या बदल्यात गावातील दोन्ही प्रवेश द्वरांना रंगरंगोटी करण्यात आली संध्याकाळी सात वाजता गावातील सर्व तरुणांनी व महिला भगिनींनी झेंडा चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिषेक करून सर्व महिलांनी आरती केली त्या प्रसंगी गावातील महिला मोठ्या प्रमाणावर उपस्थित होत्या आज दिवसभरात शिवजन्मोत्सव साजरा करतांना विविध कार्यक्रमाचे आयोजन सर्व तरुणांनी केले आणि ते योग्य रीतीने केले त्याबद्दल सर्व तरुणांचे ज्येष्ठ मंडळींकडून कौतुक करण्यात येत आहे याप्रमाणेच व यापेक्षाही चांगले सामाजिक व धार्मिक आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरुणांच्या मनात रुजतील या संकल्पनेतून पुढील 19 फेब्रुवारी रोजी शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येईल असा संकल्प करण्यात आला.
Tags
news
