राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करा शिरपुरात भाजपा महिला मोर्चा तर्फ निवेदन






शिरपूर : महाराष्ट्र  राज्याचे वनमंत्री ना. संजय राठोड यांचा राजीनामा घेऊन गुन्हा दाखल करण्यात यावा या संदर्भात दि. २७ फेब्रुवारी रोजी शिरपुर शिरपुर शहर पोलिस स्टेशनला भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा तर्फे पोलीस निरीक्षकांना निवेदन देण्यात आले. आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश सदस्य बबनराव चौधरी, तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील यांचा मार्गदर्शनाखाली शिरपूर महिला मोर्चाने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी महाराष्ट्राची कन्या पूजा चव्हाण जिने राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवला होता जिच्या निरागसतेचा फायदा घेत आपल्या राजकीय पदाचा दुर उपयोग करत तिचे शारिरीक मानसिक शोषण करून दि,७ फेबुवारी २०२१ रोज़ी आत्महत्तेस प्रवृत्त केले असे असतांना ही महाराष्ट्रात महाविकास आघाडी फक्त आपल्या ह्या गुंड प्रवृत्तीच्या महीलांचे शोषण करणार्‍या नराधमाला राजकीय प्रतिष्ठा जपण्यासाठी पाठीशी घालत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासाचा आणि परंपरेचा विचार करता वनमंत्री ना. संजय राठोड यांचा राजीनामा घेवुन त्यांचावर पुजा चव्हाण यांच्या मृत्युचा गुन्हा दाखल करण्यात यावा व पुजा चव्हाणला न्याय मिळावा असे महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. सुरेखा गिरासे, नगरसेविका सौ. मोनिका शेटे यांचा नेतृृत्वाखाली दिलेल्या निवेदनातुन मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सौ. रेवती बडगुजर, सौ पल्लवी हेमंत पाटील, सौ प्रियंका रविंद्र शेटे, सौ भाग्यश्री जगदीश शेटे,  सौ. वृषाली सरदार, सौ. सुवर्णा आसापूरे, सौ. अलका धोबी, सौ. रेखा बोरसे, सौ रूपल प्रवीण बोरसे, सौ ज्योती गुरव, सौ पुजा धीरज शेटे, रेखा मराठे , सौ. कल्याणी शिंपी आदि  महिलांच्या  साह्या आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने