शिरपूर : तालुक्यात शिरपूर पॅटर्न चे काम अहोरात्र सुरू आहे. आत्म्यापासून काम करणारे माजी मंत्री अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल हे सातत्याने तालुक्याच्या विकासासाठी झटत आहेत. आपण तालुकावासी सर्वजण नशीबवान आहोत. पटेल परिवार मार्फत शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, धार्मिक, सर्वच क्षेत्रात मनापासून कामे सुरु आहेत. शिरपूर पॅटर्न सोबतच शेत शिवार रस्ते सुद्धा हाती घेतले आहेत. शेतकरी, सर्वसामान्य यांच्या सेवेसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे प्रतिपादन तालुक्याचे आमदार काशिराम पावरा यांनी केले.
तालुक्यातील नागेश्वर येथे माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर पॅटर्न बंधारे
क्र. २६१ ते २६५ या पाच बंधाऱ्यांचे भूमिपूजन आमदार काशिराम पावरा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार काशिराम पावरा, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, जिल्हा परिषदेच्या सदस्या बेबीबाई पावरा, पंचायत समिती सदस्य दर्यावसिंग जाधव, पंचायत समिती सदस्य विजय बागुल, सर्जेराव पाटील, अजमल जाधव, रणछोड जाधव, दरबार जाधव, सुदामसिंग राजपूत, संतोष जाधव, संजय पाटील, प्रेमचंद शिरसाठ, जे. टी. पाटील, शैलेंद्र चौधरी, देविदास पाटील, अशोक कलाल, प्रकाश चौधरी, भरत मराठे, धनराज मराठे, संजय चौधरी, भालेराव माळी, अविनाश पाटील, गोकुळसिंग राजपूत, संतोष परदेशी, शत्रुघ्न पाटील, अनारसिंग जाधव, अशोक चव्हाण, आर एस भामरे, भावराव मोरे, शालिक मोरे, पोपट मोरे, रुखमाबाई रणदिवे, सदू भिल, अनेक शेतकरी, ग्रामस्थ, पदाधिकारी उपस्थित होते.
प्रास्ताविकात के. डी. पाटील यांनी शिरपूर पॅटर्न बाबत माहिती दिली. अमरिशभाई पटेल व भूपेशभाई पटेल यांनी विकासकामां सोबतच विचार पेरले आहेत,
पुढील अनेक पिढ्यांसाठी शिरपूर पॅटर्नचे काम होत आहे असेही ते म्हणाले. सूत्रसंचालन करुन अविनाश पाटील यांनी आभार मानले.
Tags
news
