शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत ऑनलाईन जाणीव जागृती स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात आला.
शिरपूर वरवाडे नगर परिषद स्वच्छ सर्वेक्षण २०२१ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत विविध कार्यक्रम आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाच्या कॅम्पस मधील एस एम पटेल ऑडिटोरिअम हॉल मध्ये शुक्रवारी दि. ५ फेब्रुवारी २०२१ दुपारी ३ वाजता लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ जयश्रीबेन पटेल यांच्या अध्यक्षतेखाली, उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल व मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
यावेळी मुख्याधिकारी अमोल बागुल यांनी स्वच्छ नमस्कार, हरित नमस्कारने कार्यक्रमात ची सुरुवात केली. पृथ्वी हिरवीगार होणे काळाची गरज असून सर्वांनी झाडे लावा व झाडे जगवा मोहीम राबवावी स्वच्छ सर्वेक्षण अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. विद्यार्थी व पालक यांचा सहभाग खूप महत्त्वाचा आहे, प्लास्टीक 1400 वर्षे टिकते, त्याचा वापर टाळा. होम कंपोस्टिंगचे घरगुती प्रयोग करा. घनकचरा तयार केले जाते जे आपण धनकचरा म्हणून उपयोगात आणू या, कचरा इतरत्र फेकू नका, ओला कचरा याचा वापर खत म्हणून वापरु शकतो. स्वच्छ शिरपूर, सुंदर शिरपूर, हरित शिरपूर ही संकल्पना सार्थ करु या. एकदिलाने काम करु या, स्वच्छता व जनजागृती मोहीम यशस्वी करु या असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले.
यावेळी पुढील यशस्वी गुणवंत यांना गौरविण्यात आले.
स्वच्छ शाळा - अमरिशभाई आर. पटेल सीबीएसई स्कूल (प्राचार्य निश्चल नायर), स्वच्छ शाळा - आर. सी. पटेल प्राथमिक शाळा, रामसिंग नगर शिरपूर (मुख्याध्यापक आर. बी. खोंडे), स्वच्छ मार्केट - शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती (सभापती नरेंद्रसिंह सिसोदिया, अविनाश पाटील, अशोक पाटील), स्वच्छ कॉलनी परिसर - किरण सोसायटी (चेअरमन नरेंद्रसिंह सिसोदिया), पालवी चिलड्रन हॉस्पिटल, स्वच्छ हॉटेल - पायल हॉटेल (प्रो. जितू गिरासे), सिटीजन फीडबॅक नोंदणी चे काम करणारे भूपेशभाई फ्रेंड सर्कल व विकास योजना आपल्या दारी टीम, नगरपरिषद सफाई कर्मचारी, कोरोना काळात फवारणी व स्वच्छता बाबत उत्कृष्ट कामगिरी साठी स्वच्छता चॅम्पियन बक्षीस महेंद्र करंकाळ व सीमा रमेश सोलंकी तसेच महिला सफाई कर्मचारी, श्रीजी इव्हेंट मॅनेजमेंट टीम, नोडल ऑफिसर स्वच्छ भारत अभियान
सागर कुलकर्णी यांनाही गौरविण्यात आले.
चित्रकला स्पर्धा पहिला गट, प्रथम अमृता दिलीप पावरा आर. सी. पटेल प्राथमिक आश्रम शाळा शिरपूर, द्वितीय समर्थ प्रवीण पाटील आर. सी. पटेल प्राथमिक शाळा क्रांतीनगर, तृतीय अर्जुन चंद्रकांत सोनवणे आर. सी. पटेल प्राथमिक शिरपूर. दुसरा गट प्रथम फकीर रुक्सार फिरोज न. प. नंबर 5 उर्दू स्कूल, द्वितीय हितेश नरेंद्र नाईक पां. बा. मा. मुनिसिपल हायस्कूल, तृतीय शाह खुशनुमा उकसमान न. प. नंबर 5 उर्दू स्कूल, तिसरा गट प्रथम चेतना अनिरुद्ध भट एच. आर. पटेल कन्या विद्यालय शिरपूर, द्वितीय दर्शना विश्वनाथ पाटील एच. आर. पटेल कन्या विद्यालय शिरपूर, तृतीय निर्वेध हरेश जैन पां.बा.मा. म्युनिसिपल हायस्कूल.
निबंध स्पर्धा- पहिला गट प्रथम समीक्षा राजेंद्र शिसोदे एच. आर. पटेल प्राथमिक, द्वितीय रोशनी संतोष पावरा आर. सी. पटेल प्राथमिक आश्रम शाळा, तृतीय कार्तिकी प्रवीणसिंग गिरासे आर. सी. पटेल प्राथमिक रामसिंग नगर, दुसरा गट प्रथम खुशराज दीपक शिंपी आर. सी. पटेल प्राथमिक क्रांतीनगर, द्वितीय प्रशांत चंद्रकांत पाटील आर. सी. पटेल प्राथमिक गुरुदत्त कॉलनी, तृतीय आकांक्षा सोनवणे एच. आर. पटेल माध्यमिक, तिसरा गट प्रथम प्राजक्ता अनिल पाटील एच. आर. पटेल जूनियर, द्वितीय विजय नारायण बडगुजर पां. बा. मा. मुनिसिपल हायस्कूल, तृतीय आदित्य सुरेश भावसार आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय.
रांगोळी स्पर्धा - पहिला गट प्रथम खुश विशाल शिंपी आर. सी. पटेल प्राथमिक वाल्मिक नगर, द्वितीय विशू पंकज पाटील आर. सी. पटेल प्राथमिक गुरुदत्त कॉलनी, तृतीय साक्षी जयेश महाजन ए. आर. पटेल सीबीएसई स्कूल, दुसरा गट प्रथम अथर्व रवींद्र भावसार आर. सी. पटेल माध्यमिक, द्वितीय साई रामकृष्ण पाटील आर. सी. पटेल माध्यमिक, तृतीय मधुरा सचिन जडिये एच. आर. पटेल कन्या, तिसरा गट प्रथम मेघा अरुण पाटील एच. आर. पटेल कन्या, द्वितीय जानवी राजेंद्र काळे आर. सी. पटेल माध्यमिक, तृतीय देवांग दहाड आर. सी. पटेल माध्यमिक.
पोस्टर स्पर्धा - पहिला गट प्रथम श्रावणी नीलेश जडे एच. आर. पटेल कन्या, द्वितीय हित जाला ए. आर. पटेल सीबीएसई, तृतीय मनोज बाळू पाटील आर. सी. पटेल प्राथमिक क्रांतीनगर, दुसरा गट प्रथम मिताली गजानन मगरे एच. आर. पटेल कन्या, द्वितीय पठाण शिफा फिरोज आर. सी. पटेल उर्दू प्राथमिक, तृतीय हेतल संजय पटेल एच. आर. पटेल कन्या विद्यालय.
शॉर्ट फिल्म स्पर्धा - पहिला गट प्रथम दिशा राहुल साळुंखे ए. आर. पटेल सीबीएसई व प्रथम धनश्री सतीश वाडीले एच. आर. पटेल कन्या विद्यालय, द्वितीय जानवी कैलास सोनवणे एच. आर. पटेल प्राथमिक, दुसरा गट प्रथम गीता मंच ग्रुप एच. आर. पटेल कन्या विद्यालय, द्वितीय सुमित संदीप बारी आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय.
जिंगल स्पर्धा प्रथम रोनक गणेश जैन आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर या सर्वांना गौरविण्यात आले.
यावेळी बांधकाम सभापती छाया ईशी, शिक्षण सभापती रेखा सोनार, नगरसेविका संगिता देवरे, नरेंद्रसिंह सिसोदिया, अविनाश पाटील, अशोक पाटील, प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी, अभियंता माधवराव पाटील, भाईदास भोई, प्राचार्य आर. बी. पाटील, प्राचार्य निश्चल नायर, जितू गिरासे, वासुदेव देवरे, संतोष माळी, दिपाली साळुंखे, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन दिपाली साळुंखे यांनी केले तर आभार प्रशासकीय अधिकारी संजय हासवानी यांनी मानले.
Tags
news
