धुळे - १५ फेब्रुवारी पासून शाळा व महाविद्यालय सुरू होणार आहेत. परंतु अद्यापही ग्रामीण भागात बस सेवा सुरळीतपणे सुरू झालेली नाही.ग्रामीण भागातील विद्यार्थींची व नागरीकांची गैरसोय होत आहे.ही गोष्ट लक्षात घेता धुळे जिल्हा काँग्रेस सेवा फाऊंडेशनचे अध्यक्ष मोहित खैरनार यांच्या नेतृत्त्वात धुळे जिल्हा काँग्रेस सेवा फाऊंडेशनच्या वतीने धुळे जिल्हा विभाग नियंत्रक सौ,सोनार मॅडम यांना लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी,या आशयाचे निवेदन देण्यात आले, यावेळी काँगेस सेवा फाऊंडेशनचे विधानसभा अध्यक्ष प्रतिक शिंदे, जिल्हा महासचिव हिमांशू अहिरे, तालुका अध्यक्ष दिपविजित बोरसे, धुळे शहर अध्यक्ष मोहित पाटील,धुळे शहर उपाध्यक्ष प्रणव पाटील,धुळे शहरसचिव कुणाल पाटील , सोशल मीडियाप्रमुख अरुण भदाणे.यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Tags
news
