जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यस्तरीय बाल काव्यमैफील स्पर्धा संपन्न




             जागतिक कर्करोग दिनानिमित्त ऑनलाइन राज्यस्तरीय बाल काव्यमैफील स्पर्धाचे आयोजन सलाम मुंबई फांऊडेशन,मुंबई व ज्ञानदीप प्रतिष्ठान,बिलाडीच्या वतीने करण्यात आले होते, त्यास उस्फूर्त असा प्रतिसाद मिळाला, बाल काव्यमैफील कार्यक्रमाचे उद्घाटन शिवछत्रपती पुरस्कार विजेते डॉ.सतीश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कार्यक्रमात प्रमुख अतिथी राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण समितीचे जिल्हा समन्वयक डॉ.नितिन पाटील आणि प्रमुख पाहुणे पंकज शिंदे, जयेश माळी, आशिफ खाटीक, नारायण भिलाणे,गोकुळ पाटील हे उपस्थित होते.

           4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिनानिमित्त तंबाखूमुक्त शाळा,गाव,परिसर व व्यसनमुक्ती या विषयास अनुसरुन झूम ॲपवर ऑनलाइन काव्यमैफिल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेमध्ये राज्यभरातील वर्धा, कोल्हापूर, धुळे, सिंधुदुर्ग, नाशिक व इतर जिल्हातील 25 बालकवींनी उस्फूर्त सहभाग नोंदवला. तंबाखू मुक्त जीवनावर आधारित स्वलिखित कवितांचे सादरीकरण करण्यात आले. यात डॉ.सतीश पाटील यांनी मार्गदर्शन पर भाषणात सांगितले की, बालवयात मुलांनी सामाजिक विषयावर लिखाण करून प्रबोधन करावे. अश्या सामाजिक,आरोग्य,व्यसनमुक्ती कार्यात मुलांनी जनजागृती करावी.सलाम मुंबई फाऊंडेशन व ज्ञानदीप प्रतिष्ठान बिलाडीने आयोजित केलेला राज्यस्तरीय बाल काव्यमैफिल कार्यक्रम स्तुत्य असा उपक्रम आहे. बालकवींना असेच व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे असे प्रतिपादन केले.

                  तंबाखूमुक्तिच्या तंबाखू मुक्त हो रे मानवा,संगत व्यसनाची,खाऊ नका तुम्ही तंबाखू,तंबाखू मुक्त शाळा,तंबाखू मुक्त जग,तंबाखूमुक्ती हीच खरी देशभक्ती,तंबाखू मुक्त भारत करूया,आजची व्यसनाधीन तरुणाई,प्रतिज्ञा व्यसनमुक्तीची अश्या वेगवेगळ्या विषयावर कवितांचे बालकवींनी सादरीकरण केले.

                   या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्ञानदीप प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज शिंदे यांनी केले. या कार्यक्रमाचे पर्यवेक्षक म्हणून नारायण भिलाने,आणि गोकुळ पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन प्राजक्ता माळी आणि जितेंद्र राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन निशांत पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भाग्यश्री शिंदे, कमलेश जाधव, अभिषेक खैरे यांनी सहकार्य केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने