विखरण ग्रामपंचायतीवर सरपंच उपसरपंच पदावर दोन्ही महिला विराजमान




विखरण -  दिनांक १२/०२/२०२१ रोजी झालेल्या सरपंच उपसरपंच निवडणुकीत ग्रामपंचायत विखरण येथे ना.म.प्र. महिला आरक्षित जागेवर सरपंच म्हणून सौ. मिना मनोज पाटील हे तर उपसरपंच पदी सौ. आशाबाई लोटन कोळी हे निवडून आले*
१३ सदस्य असलेल्या विखरण ग्रामपंचायत येथे सरपंच पदासाठी श्री. धोंडू झिंगा पाटील हे पॅनल प्रमुख असलेल्या आपला पॅनल मधून सौ. मिना मनोज पाटील व माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. वसंतराव पोपट पाटील यांच्या सूनबाई सौ. रुपाली सचिन पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यात सौ. मिना मनोज पाटील यांना 8 सदस्यांनी मतदान केले तर सौ. रुपाली सचिन पाटील यांना 5 सदस्यांनी मतदान केले त्यात बहुमताने सौ. मिना मनोज पाटील ह्या सरपंच पदासाठी विजयी झाल्यात तर माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. वसंतराव पोपट पाटील यांच्या सूनबाई सौ. रुपाली सचिन पाटील ह्या पराभूत झाल्यात.
तसेच उपसरपंच पदासाठी  श्री. धोंडू झिंगा पाटील हे पॅनल प्रमुख असलेल्या आपला पॅनल मधून सौ. आशाबाई लोटन कोळी व माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती श्री. बी. एच. पवार यांच्या पॅनलमधून श्रीमती. कमलबाई नेताजी चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यात सौ. आशाबाई लोटन कोळी यांना 8 सदस्यांनी मतदान केले तर श्रीमती. कमलबाई नेताजी चव्हाण यांना 5 सदस्यांनी मतदान केले त्यात बहुमताने *सौ. आशाबाई लोटन कोळी* ह्या उपसरपंच पदासाठी विजयी झाल्यात तर माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती श्री. बी. एच. पवार यांच्या पॅनलमधून श्रीमती. कमलबाई नेताजी चव्हाण ह्या पराभूत झाल्यात.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने