लुपिन फाऊंडेशन च्या पुढाकाराने प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिणि व एकात्मिक बालविकास प्रकल्प शिरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपकेंद्र सुळे अंतर्गत येणाऱ्या गाव-पाड्यावरील शुन्य ते सहा वर्षाच्या कमी वजनाच्या बालकांची आरोग्य तपासणी व गर्भवती मातांची आरोग्य तपासणी *लुपिन फाऊंडेशन* शिरपूर प्रकल्प वतीने करण्यात आली.
बालरोगतज्ञ डॉ.प्रविण पाटिल यांनी एकुण 52 मुलांची आरोग्य तपासणी केली.त्यापैकी दोन मुलांना धुळे येथे संदर्भित करण्यात आले.तपासणी झालेल्या मुलांना तेथेच औषधोपचार करण्यात आला.
स्त्रीरोग तज्ञ डॉ.हेमंत चौधरी यांनी आज 40 गर्भवती मातांची तपासणी केली.त्यांना रक्तवाढीच्या व औषधोपचार तेथेच करण्यात आला.
आज झालेल्या शिबीरात सर्व बालकांची वजन,उंची व दंडघेर प्रमाणे नोंद घेतली असुन पुढिल महिन्यात पुन्हा त्या बालकांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.तो पर्यंत सदर बालकांना लुपिन फाऊंडेशन च्या वतीने खजुर व नागलीचे बिस्किट पोषण आहार म्हणुन सुरु रहाणार आहे.
शिबिराच्या सुरवातीला डॉ.राष्ट्रपाल अहिरे यांनी आलेल्या सर्व लाभार्थी यांना गरोदरपणातील काळजी व बालकांचे लसीकरण याबाबतीत सखोल मार्गदर्शन केले.
सदर शिबिराला श्री.सुनिल शिंदे बालविकास प्रकल्प अधिकारी शिरपूर, डाॅ.प्रसन्न कुलकर्णि तालुका आरोग्य अधिकारी यांनी प्रत्यक्ष भेट देवुन मार्गदर्शन केले.
सदर शिबीराचे नियोजन डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांच्या मार्गदर्शनानुसार सुळे उपकेंद्रातिल आशास्वयंमसेवक व अंगणवाडी सेविका याच्या मदतीने अनिल मराठे आरोग्य सेवक व तारका पावरा आरोग्य सेविका व लुपिन फाऊंडेशन शिरपूर तालुका समन्वयक शैलेन्द्र पाटिल व संदिप तोरवणे लुपिन समन्वयक यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.प्रसंगी प्रा.आ.केंद्र रोहिणि येथिल कर्मचारीवर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.
Tags
news
