धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथे शिवजयंतीच्या निमित्ताने ग्रामपंचायत वेल्हाणे व स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्था वेल्हाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत कार्यालयात शिवप्रतिमा पूजन आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रतिमापूजन गावाच्या नवनिर्वाचित सरपंच शितलताई राजू पाटील व उपसरपंच चुडामण अण्णा मराठे यांनी केले. गेल्या कित्येक वर्षापासून शिवजयंतीची परंपरा स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. या प्रतिमा पूजन कार्यक्रमाप्रसंगी सरपंच शीतल राजपूत, उपसरपंच चुडामण मराठे, पोलीस पाटील इंद्रसिंग पवार, स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष अनिल शिंदे सचिव प्रवीण बोरसे, विवेकानंद बचत गटाचे अध्यक्ष आनंदा मराठे, ग्रामपंचायत सदस्य नवसा बाई पवार, अलकाबाई सोनवणे मालूबाई पवार, बापू इंडाईत, सतीन पवार, राजू पैलवान, लोटन वाघ,सुभाष निकुम, नाना मराठे,अरुण मराठे,वामन दादा,अविनाश वाघ बाला जिभाऊ,दत्तू भोसले,संभा पहिलवान, संजय वाघ,वाल्मीक सोनवणे,कपूर वाघ प्रवीण मोरकर,घुगरी नाना,चंद्रकांत मराठे, समाधान पिंजन,संभाजी जाधव,पवा मराठे आदी उपस्थित होते ..
Tags
news
