मोहाङी येथे थोरात विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी




                               नाशिक शातांरामभाऊ दुनबळे                    
     नाशिक-:दिङोरी् तालुक्यातील मोहाङी येथे मराठा विद्या प्रसारक संचलित कर्मवीर रावसाहेब थोरात व ज्युनिअर काॅलेज मोहाडी विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली .
    कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कादवाचे संचालक शहाजी सोमवंशी होते  .अध्यक्ष व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.यावेळी व्यासपीठावर शालेय समितीचे अध्यक्ष विलास पाटील, नंदकुमार डिंगोरे, राजेंद्र कळमकर, वनअधिकारी जी. आर. जाधव  ,डी. एम .शरमाळे, जी. बी .गणोरे, शेख साहेब, प्राचार्य श्रीराम खुर्दळ, पर्यवेक्षक सुभाष पाटील ,विनोद पाटील ,दत्ता जाधव, सतीश जाधव, चेतन लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते .
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य श्रीराम खुर्दळ यांनी केले .आपल्या भाषणातुन त्यांनी शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली .त्यांच्या कार्याचा आपण सर्वांनी आदर्श घ्यावा असे सांगितले .
    यावेळी संगीत शिक्षक दिलीप पागेरे व गीतमंचने शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी महाराष्टाचा भगवा झेंडा, व दैवत छत्रपती न आमचं दैवत छत्रपती या सुंदर पोवाडयाचे  सादरीकरण  केले .उपशिक्षक प्रदीप जाधव, नितीन जाधव व विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी झाडे लावा, झाडे जगवा या पथनाट्याचे  व झांझ पथकाचे सादरीकरण केले .
  इयत्ता दहावीच्या  विद्यार्थ्यांनी श्रावणी जाधव, सुप्रिया जाधव, व अनुष्का देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले .आपल्या भाषणातुन त्यांनी शिवाजी महाराज यांचे बालपण, आई जिजाबाई यांनी त्यांच्या वर केलेले संस्कार, स्वराज्य स्थापनेसाठी केलेला संघर्ष, राज्यात निर्माण केलेली न्यायव्यवस्था याविषयी माहिती .
उपशिक्षक प्रमोद सोनवणे यांनी यांनीही आपल्या भाषणातुन शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने आपण एक तरी झाड लावावे असे सांगितले 
     कार्यक्रमाचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी आपल्या मनोगतातुन सांगितले की शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली अन्याय, अत्याचार  याविरूद्ध लढा दिला .व आदर्श राज्यांची स्थापना केली .आज    आपण सर्वांनी शिवाजी महाराज यांच्या विचाराचे अनु
करण करावे व त्यांचा आदर्श घ्यावा असे आह्वान केले .
   कार्यक्रमास अभिनव बाल विकास मंदिर,माध्यमिक व उच्च माध्यमिकचे सर्व  शिक्षक , शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते .कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रामनाथ गडाख यांनी केले व आभार प्रदर्शन शरद निकम यांनी केले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने