रोहीणी येथे मानव विकास शिबीर व रुग्ण कल्याण समितीची सभा संपन्न-





रोहिणी- प्राथमिक आरोग्य केंद्र रोहिणी येथे जिल्हा परिषद सदस्य श्री.कैलास पावरा यांच्या अध्यक्षतेखाली रुग्ण कल्याण समितीची दुसरी सभा संपन्न झाली.प्रा.आ.केंद्र रोहिणि अंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल व राष्ट्रीय कार्यक्रम च्या अंमलबजावणी बद्दल तसेच उपलब्ध अनुदान खर्र्चा बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.रोहिणी येथिल एकंदरीत कामकाजा बाबत समिती सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
आज रोहिनी येथे मानव विकास मिशन अंतर्गत शिबीर आयोजित करण्यात आलेले होते सदर शिबीराचेही उद्घाटन दिपप्रज्वलन करून मा.कैलास पावरा जि.प.सदस्य व श्री.बागल्या पावरा पंचायत समिती सदस्य व डाॅ.प्रसन्न कुलकर्णि तालुका वैद्यकीय अधिकारी डाॅ.राष्ट्रपाल अहिरे वैद्यकिय अधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.सर्व सदस्यांनी शिबीरात दिल्या जाणाऱ्या सेवा व जेवणाची प्रत्यक्ष पहाणि करुन समाधान व्यक्त केले.
आज झालेल्या शिबीरात स्त्रीरोग तज्ञ डॉ.हेमंत चौधरी व बालरोगतज्ञ डॉ.प्रविण पाटिल यांनी तपासणी केली.एकुण 70 गर्भवती माता व 14 स्तनदा मातांची तपासणी करण्यात आली.व एकुण 18 बालकांची तपासणी करण्यात आली.
रुग्ण कल्याण समितीचे प्रास्तविक डाॅ.राष्ट्रपाल अहिरे यांनी केले,प्रा.आ.केंद्रात दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल व पुढिल नियोजना बद्दल माहीती सादर केली.
 आजच्या मिटिंग साठी  श्री.वानखेडे नाना तालुका आरोग्य सहाय्यक,श्री.अविनाश बडगुजर तालुका लेखापाल,डाॅ.आनंद पावरा स्थानिक वैद्यकीय व्यावसायिक श्री.कडु जाधव डाॅ.प्रितम माळी ,डाॅ.अमोल पवार व रुग्ण कल्याण समिती सदस्य उपस्थित होते.
मानव आरोग्य शिबीर साठी प्रा आ केंद्राच्या सर्व आरोग्य कर्मचारीवर्ग यांनी मेहणत घेतली.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने