नाशिक शांताराम दुनबळे नाशिक-:पिंपळगाव बसवंत येथे वसुंधरा अंतर्गत हरीत शपथ कार्यक्रम नुकताच
हरिओम नगर येथे माझी वसुंधरा अंतर्गत हरीओम नगर मधील सर्व सदस्य यांनी शपथ घेतली या प्रसंगी पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायतीचे उपसरपंच मा.श्री.सुहास भाऊ मोरे व ग्रामपंचायत सदस्य श्री.संजू दादा मोरे, गणेश भाऊ बनकर, अल्पेश भाऊ पारख,दिपक भाऊ विधाते व प्रशासकीय कर्मचारी म्हणून दिपक भाऊ मोरे असे सर्व मान्यवरांच्या साक्षीने हरिओम नगर मधील सदस्यांनी वसुंधरेची शपथ घेऊन आपले काहीतरी समाजाचे व निसर्गाचे देणे लागते याची जाणीव करुन दिली या कार्यक्रम प्रसंगी शेवटी सोसायटीचे चेअरमन पञकार श्री.मनोहर देसले यांनी उपसरपंच श्री.सुहास भाऊ मोरे व सर्व आलेले मान्यवर यांचा यथोचित सत्कार केला व शेवटी श्री. रमाकांत शिदे सर यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.
Tags
news
