शिरपूर : आर.सी.पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील संघ "टॉयफेस्ट-2021", "टॉय कॅथॉन-2021" या स्पर्धेत सहभागी झाले होते. यातील चार विद्यार्थ्यांची ग्रँड फिनाले साठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली.
सदर स्पर्धेचे उद्घाटन केंद्रीय महिला व बालकल्याण विकास आणि टेक्सटाईल मंत्रालय मंत्री स्मृती इराणी व केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांच्या हस्ते दि. 5 जानेवारी 2021 रोजी करण्यात आले होते.
विद्यालयातील सहभागी झालेल्या चार संघांपैकी एक संघ 12 फेब्रुवारी 2019 रोजी जाहीर झालेल्या ग्रँड फिनाले च्या निकालानुसार इयत्ता 9 वी तील संघ प्रमुख यश सिताराम माळी, संघ सदस्य तेजस रवींद्र भावसार, गौरव संदीप बागुल, हेमांशु जयापलसिंग गिरासे या संघाची भारतातील सहभागी 31,000 स्पर्धकांमधून ग्रँड फिनाले साठी राष्ट्रीय स्तरावर निवड झाली.
अटल लॅब इन्चार्ज व्ही. डी. पाटील, एन. ई. चौधरी यांनी सदर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. संस्था उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सीईओ डॉ उमेश शर्मा, मुख्याध्यापक पी. व्ही.पाटील यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार केला.
Tags
news
