आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाला नॅक चे ‘ए’ ग्रेड मानांकन जाहीर



शिरपूर : येथील आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाला नॅक चे ‘ए’ ग्रेड मानांकन बहाल करण्यात आला असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

नॅक पियर टीमने महाविद्यालयाला दि. २९ जानेवारी व दि. ३० जानेवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन मूल्यांकन केले. नॅशनल असेसमेन्ट अँड अक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) बंगलोर हि संस्था उच्च शैक्षणिक संस्था, महाविद्यालये, विद्यापीठे किंवा इतर मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेची ‘गुणवत्ता स्थिती’ चे मूल्यमापन व मूल्यांकन करण्यासाठी आहे. या मध्ये प्रामुख्याने शैक्षणिक प्रक्रिया आणि परिणाम, अभ्यासक्रम कव्हरेज, अध्यापन-शिक्षण प्रक्रिया, विद्याशाखा, संशोधन, पायाभूत सुविधा, शिक्षण संसाधने, संस्था व शासन, आर्थिक कल्याण आणि त्यासंबंधित गुणवत्तेच्या मानदंडांच्या कामांच्या बाबींचा समावेश आहे.

नॅशनल असेसमेन्ट अँड अक्रिडिटेशन कौन्सिल (नॅक) चे ध्येय व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी गुणवत्ते बाबत मूल्यांकन, पदोन्नती आणि निर्वाह उपक्रमांच्या संयोजनाद्वारे उच्च शिक्षणा बाबतचे घटक गुणवत्तापूर्ण बनविणे, उच्च शिक्षण संस्था किंवा त्यातील घटक किंवा विशिष्ट शैक्षणिक कार्यक्रम किंवा प्रकल्पांचे नियमित मूल्यांकन आणि मान्यता देण्याची व्यवस्था करणे, उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण आणि संशोधनाच्या गुणवत्तेस प्रोत्साहन देण्यासाठी शैक्षणिक वातावरणाला उत्तेजन देणे, उच्च शिक्षणात स्व-मूल्यांकन, उत्तरदायित्व, स्वायत्तता आणि नवकल्पनांना प्रोत्साहित करण्यासाठी, गुणवत्तेशी संबंधित संशोधन अभ्यास, सल्लामसलत आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेणे आणि गुणवत्तेचे मूल्यांकन, पदोन्नती आणि पोषण यासाठी उच्च शिक्षणाच्या इतर भागधारकांसह सहयोग करणे इ. बाबींचा विचार केला जातो.

मूल्यांकनाचे निकष हे सात विभागात आहेत. १. करीकुलम आस्पेकट, २. टीचिंग लर्निंग इव्हाल्युएशन ३. रिसर्च इन्होवेशन अँड एक्सटेंशन ४. इन्फ्रास्ट्रकचर अँड लर्निंग रिसोर्सेस ५. स्टुडन्ट सपोर्ट अँड प्रोग्रेशन ६. गव्हर्नन्स लीडरशिप अँड मॅनेजमेंट ७. इंस्टिट्युशनल व्हॅल्यू अँड बेस्ट प्रॅक्टिसेस ८. पार्ट बी. फार्मसी हे आहेत. हे सर्व निकष विविध प्राध्यापक यांचे ग्रुप विभागून काम केले आहे. वरील सर्व निकष प्रक्रिया पूर्ण करून त्या संबंधित लागणारे दस्तावेज व अहवाल नॅक च्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आले. त्या अनुषंगाने ६५ टक्के मूल्यमापन करण्यात आले. त्या नंतर नॅक पियर टीम ने महाविद्यालयाला दि. २९ व दि. ३० जानेवारी २०२१ रोजी प्रत्यक्ष भेट देऊन उर्वरित ३५ टक्के मूल्यांकन केले. यात त्रिसदस्सीय समितीचा सहभाग होता.

प्रथमतः महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांनी प्रेसेंटेशन च्या माध्यमातून महाविद्यालयाची माहिती दिली. महाविद्यालयाच्या इंटर्नल क्वालिटी अशुरन्स कमिटीचे को-ओर्डीनेटर उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर यांनी समिती समोर प्रेसेंटेशन चे सादरीकरण केले. फार्माकॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. सी. आर. पाटील, क्लिनिकल फार्मसी विभाग प्रमुख डॉ. श्रीमती एस. डी. पाटील, फार्मासुटिक्स विभाग प्रमुख डॉ. हितेंद्र महाजन, क्वालिटी अशुरन्स विभाग प्रमुख डॉ. एस. एस. चालीकवार,  फार्माकोग्नोसी विभाग प्रमुख डॉ. मोहन कळसकर, फार्मासुटिकल टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. आशिष गोरले, रेगुलेटोरी अफेयर्स विभाग प्रमुख डॉ. पंकज नेरकर, ग्रंथपाल नितीन माळी यांनी समितीला आपापल्या विभागाची सविस्तर माहिती दिली. रजिस्ट्रार जितेश जाधव व हरी पटेल यांनी महाविद्यालयाची कार्यालयीन माहिती पुरविली. डॉ. संदीप फिरके व डॉ. मोहम्मद मुजीब खान यांनी परीक्षा विभागाची माहिती दिली.

यानंतर समितीने महाविद्यालयाचे इन्फ्रास्ट्रक्चर, सर्व विभाग, त्यातील शिक्षणाभिमुख व संशोधनात्मक तंत्रप्रणाली याची सखोल पाहणी केली. समितीने महाविद्यालयातील ग्रंथालय, मेडिसिनल प्लांट गार्डन, डे केयर सेंटर, बॉईज कॉमन रूम, गर्ल्स कॉमन रूम, स्पोर्ट्स रूम, क्लास रूम्स, इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स, स्टाफ रूम, सर्व लॅबोरेटोरीज, लँग्वेज लॅब, प्लेसमेंट सेल, वुमन फोरम, सोलर पॅनल, फायर हैड्रन्ट सिस्टिम्स, आर. ओ. वॉटर सिस्टिम्स, कॉलेज कॅन्टीन, जेनेरिक औषधी केंद्र, स्टुडन्ट को-ऑपेराटीव्ह सेंटर, बॉईज हॉस्टेल, गर्ल्स हॉस्टेल, वॉटर कॉन्झर्वेशन प्रकल्प, व्हर्मी कंपोस्ट खताचा उपक्रम, स्पोर्ट ग्राऊंड यांची सखोल पाहणी केली. क्रीडा विभागात कार्यरत असलेले २० स्पोर्ट कोचेस याबाबत माहिती देण्यात आली. समितीने विद्यार्थी, माजी विद्यार्थी, पालक, प्राध्यापक, व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी सुसंवाद साधला व अभिप्राय घेतला. समिती समोर विद्यार्थांनी निवडक सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

महाविद्यालयात नॅक पियर टीम व्हिजीट साठी स्वतंत्र दालन उभारण्यात आले आहे. त्यात नॅक संदर्भातील सर्व दस्तावेज, बुकलेट्स, प्रेसेंटेशन्स व पोस्टर्स ठेवण्यात आले होते. समितीने सर्व निकषांचे दस्तावेजांची सखोल तपासणी केली व प्रत्येक विभागाचे मूल्यमापन केले. डी. व्ही. व्ही. व एस. एस. आर. अहवालाच्या आधारे महाविद्यालयाला ‘ए’ ग्रेड बहाल करण्यात आला. 
या पूर्वी देखील केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रँकिंग फ्रेमवर्क (एन. आय. आर. एफ.) अंतर्गत महाविद्यालय देशभरातून राष्ट्रीय पहिल्या ५० च्या आत आहे. आखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद (ए. आय. सी. टी. ई.) व भारतीय उद्योग महासंघ (सी. आय. आय.) यांच्या संयुक्त “इंडपॅक्ट -२०२०” सर्वेक्षणात आर. सी. पटेल फार्मसीला “सुवर्ण” मानांकन प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाला नॅशनल बोर्ड ऑफ अक्रेडीटेशन (एन. बी. ए.) द्वारे ६ वर्षांसाठी मानांकन मिळाले आहे. महाविद्यालय समाजोपयोगी संशोधन करण्यासाठी प्रसिद्ध असून आजपर्यंत तब्बल ७.३० कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा संशोधन निधी, अनुदान विविध राष्ट्रीय संशोधन संस्था ए. आय. सी. टी. ई., यु.जी.सी., डी.एस.टी.), डी.बी.टी., आय.सी.एम.आर., आयुष इ. कडून प्राप्त झाले आहे. महाविद्यालयाने आतापर्यंत १२ पेटंट फाईल केलेले असून २ पेटंट मंजूर झालेले आहेत. महाविद्यालयामधील प्राध्यापकांचे ८०० हून आधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या नियतकालिकां मध्ये प्रसिद्ध झालेले आहेत.

आर. सी. पटेल फार्मसी मधील ३८ हून अधिक प्राध्यापकांना शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी पीएच. डी. प्राप्त असून उर्वरित प्राध्यापकांचे पीएच. डी. चे संशोधन चालू आहे. महाविद्यालयाकडे ३१ हून अधिक एम. ओ. यू. आहेत तसेच १० पेक्षा जास्त पेटंट आहेत त्यापैकी ३ ग्रांटेड, ३ पब्लिश, ४ प्रोसेस मध्ये आहे. 
महाराष्ट्र-राज्यशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार, अए.पी.टी.आय. चा प्रिन्सिपल ऑफ द इयर पुरस्कार, आऊटस्टँडींग परफॉरमन्स अवार्ड अशा अनेक पुरस्काराने सन्मानित झालेले प्राचार्य डॉ. संजय सुराणा हे या महाविद्यालयाचे समर्थ नेतृत्व करत आहेत.

आंतरराष्ट्रीय मानदंडा नुसार असलेल्या प्रयोगशाळा, अनुभवी प्राध्यापक हे महाविद्यालयाचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. गुणवत्तेशी कुठलीही तडजोड न करता गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुमारे १ कोटी रुपयांची पारितोषिके तसेच विशेष शिष्यवृत्ती योजना या मुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठच नाही तर देशभरात आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाचा नावलौकिक झाला आहे.

महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठ तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध विक्रमांची नोंद केली आहे. विद्यापिठीय परीक्षांत सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यामध्ये सर्वाधिक विद्यार्थी या महाविद्यालयाचे असतात. केवळ औपचारिक शिक्षण हेच महाविद्यालयाचे धोरण नसून, विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व परिपूर्ण होऊन तो जागतिक स्पर्धेला आत्मविश्वासाने सामोरा गेला पाहिजे म्हणूनच देश विदेशातील तज्ञाची व्याख्याने, प्रात्यक्षिके, शिबीर, चर्चासत्र या सारखे उपक्रम नेहमी राबविले जातात. रोजगाराभिमुखता हे या महाविद्यालयाचे वैशिष्ट्य असून येथील विद्यार्थी नामवंत उद्योग समूहामध्ये मानाच्या पदांवर कार्यरत आहेत.

विविध नामांकित औषध निर्मात्या कंपनी कॅडीला हेल्थ केयर, टी. सी. एस., सन फार्मा, म्याकलॉइड, सिप्ला, लुपिन, एमक्युर, डॉ. रेड्डीज ई. यांची कॅम्पस मुलाखतीसाठी याच महविद्यालयाची निवड करतात. इतरत्र विद्यार्थ्यांना रोजगाराची समस्या जाणवत असतना सर्वाधिक प्लेसमेंट होऊन येथील विद्यार्थी मोठ्या वेतन श्रेणीवर नियुक्ती मिळवत आहेत.

डॉ. पी. एस. जैन, डॉ. एस. सी. खडसे, डॉ. कपिल अग्रवाल यांनी टीचिंग लर्निंग पोर्टफोलिओ चे कामकाज पाहिले. डॉ. हरून पटेल व डॉ. दीपक लोकवानी यांनी रिसर्च अँड डेव्हलोपमेंट ची माहिती दिली. कमलेश कुरणकर व डॉ. आर. एस. भास्कर यांनी आय. टी. सेलचे काम पाहिले.डॉ. मनोज गिरासे व श्रीमती सविता मंदान यांनी कल्चरल इव्हेंट आयोजन केले. डॉ. योगिता अग्रवाल व डॉ. मोनिका ओला यांनी वुमन फोरम सेल चे काम पाहिले. प्रा. शीतल महाले यांनी ट्रेनिंग आणि प्लेसमेंट विभागाची माहिती दिली. डॉ. के. आर. पाटील यांनी इंटर्नल ऑडिट अहवाल तयार केले. डॉ. पंकज जैन व डॉ. चंद्रकांतसिंह परदेशी यांनी माजी विद्यार्थी पोर्टफोलिओ चे काम बघितले. डॉ. राजू सोनावणे, डॉ. प्रशांत चौधरी, प्रा. स्नेहल भावसार यांनी प्रसिद्धी माध्यमांचे कामकाज पाहिले. तसेच डॉ शीतल झाम्बड, डॉ. आनंदा  मुंदडा  डॉ. एस. बी. गणोरकर, डॉ. विनोद उगले, डॉ. विजय सोनार, प्रा. विशाल गुरुमुखी, प्रा.आमोद पाटील, सर्व प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली. 

या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री आ. अमरिशभाई पटेल, कार्याध्यक्ष व उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, सचिव प्रभाकरराव चव्हाण, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय सुराणा, उपप्राचार्य डॉ. अतुल शिरखेडकर, पदविका महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन हासवानी, एस. व्ही. के. एम. शिरपूर कॅम्पसचे मुख्य लेखापाल व प्रशासक राहुल दंदे यांनी अभिनंदन केले व उत्तरोत्तर अशीच कामगिरी होत राहावी म्हणून शुभेछा दिल्या.

-----------------
-----------------------
प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांनी महाविद्यालयाला नॅक द्वारे ‘ए’ ग्रेड प्राप्त झाल्याबद्दल यशाचे श्रेय विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, शिरपूर एजुकेशन सोसायटीचे संचालक मंडळ यांना दिले.
-------------------
-------------------------
संस्थेचे अध्यक्ष आ. अमरीशभाई पटेल यांनी आर. सी. पटेल फार्मसी महाविद्यालयाला नॅक द्वारे ए ग्रेड प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. संजय सुराणा यांचे अभिनंदन केले. विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे कौतुक केले तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने