अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट दरम्यान ‘आत्मनिर्भर स्वस्थ भारत’ या नव्या योजनेची घोषणा केली.
या योजनेसाठी पुढील सहा वर्षांसाठी ६४,१८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
राष्ट्रीय आरोग्य योजनेच्या व्यतिरिक्त ही तरतूद असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
या योजनेंतर्गत गावापासून शहरापर्यंत आरोग्य सुविधा सुधारण्याचा प्रयत्न केला जाणार आहेत.
सीतारामन म्हणाल्या, आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेंतर्गत प्रतिबंधात्मक, गुणकारी, कल्याणकारी आरोग्य सेवेवर भर दिला जाणार आहे.
या योजनेसाठी दिलेला निधी प्राथमिक स्तरापासून ते उच्च स्तरावरील आरोग्य सेवा विकसित करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.
Tags
news
