⭕ “पेट्रोल-डिझेल १००० रुपये लिटर करुन मोदी सरकारला लोकांना मारायचं असेल”.........



 
देशाचा अर्थसंकल्प सादर करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. 
कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवत असल्याचं म्हटलं आहे. 
पेट्रोलवर प्रति लिटर अडीच रुपये, तर डिझेलवर प्रति लिटर चार रुपये अधिभार आकारला जाणार आहे. 
या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे. 
मात्र या वाढलेल्या अधिभारावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केंद्राला आपल्या खास शैलीमध्ये टोला लगावला आहे. 
अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर संजय राऊत यांनी दिल्लीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. 
त्यावेळी राऊत यांना पेट्रोल-डिझेलवर वाढवण्यात आलेला अधिभार या विषयावर प्रश्न विचारण्यात आला. 
या प्रश्नाला राऊत यांनी उपहासात्मक पद्धतीने उत्तर दिलं आहे.
 “आता पेट्रोल शंभर रुपये लिटर झालं आहे. 
त्यांना (मोदी सरकारला) बहुतेक हजार रुपये लिटर करुन लोकांना कायमचं मारायचं असेल,” असा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. 
“आधी लॉकडाऊनमुळं लोकं घरात होते आता पेट्रोलमुळे लोकांना प्रवास करता येणार नाही. 
लोकांनी कायमचं घरीच बसावं हरी भजन करत, असं बहुतेक सरकारला वाटत असेल,” असंही राऊत म्हणाले आहेत.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने