जिल्हा नियोजन समितीची तीन फेब्रुवारी रोजी बैठक




धुळे, दि. 31 (जिमाका वृत्तसेवा) :  जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवार तीन फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात होणार आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी ममता हटकर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. 
धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष साहाय्य विभागाचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. बैठकीत जिल्हा नियोजन समितीच्या 25 जानेवारी 2020 रोजी झालेल्या बैठकीमधील इतिवृत्तावरील केलेल्या कार्यवाहीचा अहवाल वाचून कायम करणे व त्यास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2019- 20 (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना) खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना 2020- 2021  (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना) या वार्षिक योजनांचा 15 जानेवारी 2021 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा घेणे,  जिल्हा वार्षिक योजना 2021- 2022 (सर्वसाधारण, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना) च्या प्रारुप आराखड्यास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2020- 2021 (सर्वसाधारण योजना, आदिवासी उपयोजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना व अनुसूचित जाती उपयोजना) पुनर्विनियोजन प्रस्तावास मान्यता देणे, मा. अध्यक्ष, जिल्हा नियोजन समिती, धुळे यांच्या परवानगीने आयत्या वेळच्या विषयांवर चर्चा करण्यात येईल, असेही जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती हटकर यांनी म्हटले आहे

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने