हिंदूह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय "बाळासाहेब ठाकरे" यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर येथे भगवा सप्ताहला





  शिरपूर -हिंदूह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय "बाळासाहेब ठाकरे" यांच्या जयंतीनिमित्त शिरपूर येथे भगवा सप्ताहला सुरवात झाली असून बाळासाहेबांच्या" प्रतिमा पूजन व महिला आरोग्य आणि रक्त तपासणी शिबीर घेवून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
आज दिनांक-२३ जानेवारी २०२१ रोजी शिरपूर तालुका शिवसेना कार्यालयात भगवा चौक येथे  शिवसेनेच्या वतीने हिंदूह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय "बाळासाहेब ठाकरे" यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन धुळे जिल्हा प्रमुख(ग्रामीण)- इंजि.हेमंतजी साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख अतिथी शिरपूर पोलिस निरीक्षक- हेमंत पाटील  हे उपस्थित होते. 
शिवसेना महिला आघाडी शिरपूर तालुका ह्यांच्या माध्यमातून महिला आरोग्य तपासणी शिबिर डॉ.सुनिल चौधरी व डॉ.कांचन चौधरी यांच्या सहकार्याने आरोग्य तपासणी व रक्त चाचणी अमोल पाठक यांच्या हिंद लॅब द्वारे रक्त तपासणी करण्यात आली. महिला आघाडीच्या सौ.वीणा देशपांडे, सौ.अर्चना देसले, लक्ष्मी कोकणी ह्यांनी आयोजन केले. 
दि.२३ जानेवारी २०२१ ते दि.३० जानेवारी २०२१ दरम्यान साजरा होणारा भगवा सप्ताहला सुरवात करण्यात आली.
 कार्यक्रमात वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला कार्यक्रमाला प्रसंगी शिवसेनेचे धुळे उपजिल्हा प्रमुख श्री.भरतसिंग राजपूत , विधानसभा क्षेत्र प्रमुख -छोटुसिंग राजपूत,उपजिल्हा संघटक-श्री.विभाभाई जोगरणा, एसटी कामगार सेना जिल्हाध्यक्ष-श्री.रजेसिंग राजपूत(राजू टेलर),तालुका प्रमुख -श्री.दिपक चोरमले,तालुका प्रमुख-इंजि.अत्तरसिंग पावरा, शहर प्रमुख-श्री.मनोज धनगर ,किसान विद्या प्रसारक संस्थाच्या(खजिनदार) श्रीमती.आशाताई रंधे, शिंदखेडा शहर प्रमुख-नंदकिशोर पाटील, श्री.हिरालाल बोरसे-स्थानिक लोकाधिकार समिती, माजी.हिम्मतसिंग महाजन, उपतालुका प्रमुख-श्री.राजेंद्र गुजर, श्री.मंगलसिंग भोई, श्री.अभय भदाणे, शहर संघटक-प्रेम चौधरी, उपशहर प्रमुख-योगेश ठाकरे, बंटी लांडगे, सिद्धार्थ बैसाणे, गोलू पाटील, युवा सेना तालुका प्रमुख- विजय पावरा,शहर प्रमुख-गोलू मराठे, वाहतूक सेना तालुका अध्यक्ष- नंना बंजारा, तालुकाउपाध्यक्ष- तुषार महाले, शहर अध्यक्ष-जितेंद्र पाटील, पिंटू शिंदे, रोहिदास पावरा, बाप्पू पावरा, सुरेश भिल, दिनेश गुरव ,नितीन शिरसाठ,दिलीप धनगर,सयाजी भिल, गणेश बिरारी,देवाजी पाटील, पंकज माळी, विजय पारधी, सचिन बडगुजर, यश मराठे, ओम मराठे, गोलू बेंडवाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते श्री.मनोज महाजन ,श्री.नितीन निकम व  आणि आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने