शिरपूर : तालुक्यातील क्रिकेट खेळाडूंसाठी सुवर्णसंधी चालून आली असून श्री विले पार्ले केळवणी मंडळ यांच्या मार्फत शिरपूर शहरात १७ वर्षातील क्रिकेट खेळाडूंसाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. संस्थेचे अध्यक्ष तथा माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, संस्था सह-अध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे जिल्ह्यात एस. व्ही. के. एम. संस्थे तर्फे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्था नियमितपणे प्रयत्नशील आहे.
धुळे जिल्ह्यातून जास्तीत जास्त आंतरराष्ट्रीय खेळाडू घडावे या पटेल परिवाराच्या उदात्त हेतू व स्वप्नांच्या पूर्तीसाठी संस्था वरील उपक्रमाचे आयोजन त्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे.
सदर क्रिकेट स्पर्धेत धुळे जिल्ह्यातील उत्कृष्ट १७ वर्षातील खेळाडू निवड पद्धतीने खेळविले जाणार असून शिरपूर तालुक्यातील खेळाडूंसाठी निवड चाचणी दि. १४/१/२०२१ गुरुवार रोजी आर. सी. पटेल फार्मसी कॉलेज मैदान शिरपूर येथे सकाळी ठीक ८ वाजेला आयोजित केली आहे. तरी इच्छुक खेळाडूंनी निवड चाचणीसाठी येताना क्रीडा गणवेशात व आपल्या क्रिकेट साहित्यासोबत वेळेवर हजर राहावे. वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड, जन्मदाखला, शाळेचे बोनाफाईड यापैकी एक झेरॉक्स प्रत सोबत आणावी. जास्तीत जास्त खेळाडूंनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी राकेश बोरसे ९८५०६६१४३६, संदीप देशमुख ९८८१८०७९०१, कुणाल गिरासे ८८५६९५९५१९ यांच्याशी संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे.
Tags
news
