शिरपूर : एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालय शिरपूर व आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर येथील अटल टिंकरिंग लॅब यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 10/ 01/2021 रविवार रोजी विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढावी यासाठी जिल्हास्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान स्पर्धेचे आयोजन केले होते.
ही स्पर्धा शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे सीईओ डॉ. उमेश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.
या स्पर्धेचे नियोजन व कार्यवाही प्राचार्य पी. व्ही. पाटील व प्राचार्य आर. बी. पाटील यांनी केले.
या स्पर्धेमध्ये एच. आर. पटेल कन्या माध्यमिक विद्यालयातून मोठ्या गटातून 22 विद्यार्थिनी व लहान गटातून 16 विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदवला. यातून जिल्हास्तरावरून विभाग स्तरासाठी मोठ्या गटातून गिरासे निलाक्षी जगदीश, कदम ममता भरत, लोहार हर्षू लीलाधर, वळवी विशाखा शामसिंग, चौधरी चैताली राजेंद्र, धाकड योगिता प्रमोद तसेच लहान गटातून जडे श्रावणी निलेश, पाटील तेजस्विनी पंकज, परदेशी योगाक्षी राहुलसिंग यांची निवड झाली.
तसेच आर. सी. पटेल माध्यमिक विद्यालय शिरपूर येथून मोठ्या गटातून 10 विद्यार्थी लहान गटातून 6 विद्यार्थी यांनी सहभाग नोंदवला. यातून मोठ्या गटातून पाटील दिग्विजय नानू, सोनवणे हर्षल प्रमोद यांची निवड झाली.
या स्पर्धेचे परीक्षण श्रीमती दिपाली दाभाडे व ललित कुलकर्णी (जिल्हा समन्वयक राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद धुळे) यांनी केले. स्पर्धेच्या यशस्वितेसाठी संस्थेचे अटल को-ऑर्डिनेटर एन. ई. चौधरी, अटल इन्चार्ज बी. एस. महाजन, व्ही. डी. पाटील, सर्व विज्ञान व गणित शिक्षक, सर्व वर्गशिक्षक यांनी परिश्रम घेतले.
Tags
news
