आर. सी. पटेल आय.एम.आर.डी. च्या राष्ट्रीय सेवा योजना एककाद्वारे वाहतुक सुरक्षा ऑनलाईन सप्ताह कार्यक्रम संपन्न




शिरपूर : येथील आर. सी. पटेल एज्युकेशनल ट्रस्ट संचलित इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्च ॲण्ड डेव्हलपमेंट, शिरपूर या परिसंस्थेद्वारे वाहतुक सुरक्षा ऑनलाईन जनजागृती सप्ताहाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाच्या माध्यमातून करण्यात आले. 

ऑनलाईन प्रशिक्षण वर्ग नाशिक येथील नामांकीत सामाजिक संस्था नासिक फर्स्ट फाउंडेशन यांच्याद्वारे घेण्यात आले. दि. 28 डिसेंबर 2020 ते 2 जानेवारी 2021 या दरम्यान घेण्यात आलेल्या या सप्ताहाचे उद्घाटन सत्राच्या प्रसंगी परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी आजच्या युवकांची रस्ता वाहतूक बाबातची जबाबदारी याबद्दलचे महत्व विषद करुन विद्यार्थी हे तांत्रिक दृष्ट्या सक्षम असण्यासोबत भारताचे जबाबदार नागरिक घडविणे, हा संस्थेचा उद्देश आहे असे प्रतिपादन केले.
उद्घाटन सत्राचे वेळी नासिक फर्स्ट फाउंडेशनचे भिमाशंकर धुमाळ, मयुर बागुल, इतर पदाधिकारी ऑनलाईन सत्राद्वारे उपस्थित होते. नासिक फर्स्ट या सामजिक संस्थेने आजवर सुमारे दिड लाख विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आर. सी. पटेल आय.एम.आर.डी. च्या बी.सी.ए., बी.बी.ए., बी.एम.एस., इंटीग्रेटेड एम.सी.ए. च्या प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांना आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना देखील वाहतुक सुरक्षेचे ऑनलाईन धडे मयुर बागुल आणि सौ. सोनाली पवार या प्रशिक्षकांनी दिले.
या रस्ता सुरक्षा ऑनलाईन जनजागृती उपक्रमात विद्यार्थ्यांना रस्ते अपघाताबाबत सविस्तर माहिती देऊन उत्तम वाहन चालकाचे कौशल्य, वाहतुकीची शिस्त, वाहन चालवितांना घ्यावयाची काळजी व होणारे अपघात टाळण्यासाठीची खबरदारी याबद्दलेचे मार्गदर्शन दृकश्राव्य पध्दतीने देण्यात आले. या सप्ताहात 250 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. विद्यार्थ्यांमध्ये वाहतुक सुरक्षा व रस्ता अपघात याबाबतची जनजागृती व्हावी यादृष्टीने दि. 29 डिसेंबर 2020 रोजी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये 48 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.

या उपक्रमासाठी परिसंस्थेच्या संचालिका डॉ. वैशाली पाटील, प्रा. मनोज बेहेरे, डॉ. मनोज पटेल, प्रा. तुषार पटेल यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सप्ताहाच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या एककाचे समन्वयक प्रा. मनोज पाटील यांनी पुढाकार घेतला व उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. छाया पाटील, प्रा. विजय गर्गे, प्रा. विवेक चव्हाण, प्रा सुरज निकम, सहकारी प्राध्यापकांचे सहकार्य लाभले.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने