शिरपूर : महाराष्ट्र पत्रकार संघाच्या धुळे जिल्हाध्यक्षपदी येथील दैनिक समाज शक्तीचे संपादक ईश्वर बोरसे यांची सलग दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे.संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी बोराडी येथील पत्रकार अंबादास सगरे तर सचिव पदी लक्ष्मण गोपाळ यांची नियुक्ती करण्यात आली.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास कोळेकर यांनी दोघांची नियुक्ती जाहीर केली.तसेच पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी,पत्रकारांच्या संरक्षणासाठी करण्यात आलेल्या कायद्यांची अंमलबजावणी आदी अनेक मुद्यांवर निर्णायक चर्चा करण्यात आली.त्यादृष्टीने महाराष्ट्र पत्रकार संघाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पत्रकारांचे संघटन मजबूत करण्यासाठी जिल्हा कार्यकारिणी गठित करण्यात आली. संघाची जिल्हा कार्यकारिणी लवकरच घोषित केली जाणार असल्याचे जिल्हाध्यक्ष ईश्वर बोरसे यांनी सांगितले.या नियुक्तीबद्दल बोरसे व सगरे तसेच गोपाळ यांचे विविध पत्रकार संघटनांकडून अभिनंदन करण्यात आले.
Tags
news

