शिरपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व ग्रामपंचायत निवडणुकितील पॅनल प्रमुख, उमेदवार यांना सूचना




 शिरपूर - उद्या मतमोजणी असून विजयी उमेदवार यांनी कुठल्याही प्रकारची मिरवणूक काढायची नाही. *सध्या जिल्ह्यात कलम 37(1)(3) महाराष्ट्र पोलीस अधिनियमचा अमल चालू आहे.आपले गावात DJ किंवा साउंड बॉक्स/बँड लावून मिरवणूक काढणे,उगाच पराभूत उमेदवार यांचे गल्लीत/घरासमोर जाऊन फटाके वाजवणे,गुलाल उधळणे असे वर्तन/प्रकार कटाक्षाने टाळावेत.जो कोणी असे प्रकार करील व त्यावरून दोन्ही गटात भांडणे होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास.सर्वस्वी उमेदवार व पॅनल प्रमुख यांना जबाबदार धरून त्यांचेवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.* त्यासाठी सर्व उमेदवार व पॅनल प्रमुख यांना अगोदरच कलम 149 फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमाणे नोटीस देण्यात आल्या आहेत. 
        तसेच पराभूत उमेदवार यांनी देखील मोठ्या मनाने पराभव स्विकारुन कोणत्याही प्रकारचा खोडकर पणा न करता कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी. *त्यांनी विजयी उमेदवार यांचे स्वागत करून गावच्या विकासात  मदत करावी. निवडणुकीत विजय आणि पराभव होत असते. त्यामुळे त्याचा सर्वांनी आनंदाने स्विकार करावा. व गावातील सामान्य नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची पॅनल प्रमुख/विजयी उमेदवार/पराभूत उमेदवार यांनी दक्षता घ्यावी ही  अशी विनंती व सूचनहेमंत पाटीलपोलीस निरीक्षक शिरपुर शहर पोलीस स्टेशन यांनी केली आहेे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने