शिरपूर : श्री क्षेत्र नागेश्वर सेवा संस्थान च्या वतीने नागेश्वर अजनाड बंगला येथे
बंजारा समाजाचे आराध्य दैवत मोती मातेच्या मंदिराचे निर्माण नुकतेच गेल्या वर्षी करण्यात आले होते. याच मंदिरात किर्तन व अनेक धार्मिक कार्यक्रम दि. २८ जानेवारी रोजी संपन्न झाले. धार्मिक कार्यक्रम मुळे श्री नागेश्वर परिसरात सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून आला.
परमपूज्य राष्ट्रीय संत आनंद चैतन्यजी महाराज (श्री हरिहर चैतन्य धाम भांबरवाडी,कन्नड) यांच्या सह श्री नागेश्वर सेवा संस्थान चे अध्यक्ष तथा शिरपूरचे उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, श्री नागेश्वर सेवा संस्थान चे सर्व ट्रस्टी, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष के. डी. पाटील, दर्यावसिंग जाधव, दरबार जाधव, रणछोड जाधव, अनारसिंग जाधव, तोताराम जाधव, सोमा शिंदे, संजय चौधरी, राजेश भंडारी, भालेराव माळी, संजय पाटील, भटू माळी, गोविंद राठोड, संतोष जाधव, अशोक चव्हाण सावेर, नाना भगत भिल, संजय गुजर, साहिल पाटील, देविदास पाटील, अनेक समाज बांधव, शिरपूर तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील सरपंच, ग्रामस्थ उपस्थित होते.
परमपूज्य राष्ट्रीय संत आनंद चैतन्यजी महाराज यांनी यावेळी जनसमुदायाला मार्गदर्शन करून आपापसात कोणताही भेदभाव न करता प्रेमाने जीवन व्यतीत करावे असे आवाहन केले.
श्री नागेश्वर सेवा संस्थान चे अध्यक्ष भुपेशभाई पटेल यांनी देखील आपल्या मनोगतातून सर्वांना मोलाचे मार्गदर्शन करून भावनात्मक मनोगत व्यक्त केले.
तोताराम जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.
भुपेशभाई पटेल यांनी मोठ्या प्रमाणात चमत्कार करून श्री नागेश्वर परिसराला वेगळे रूप प्राप्त करून दिले आहे. निसर्गरम्य, नयनरम्य या परिसराला भुपेशभाई यांनी महाराष्ट्रातील आगळेवेगळे पर्यटन स्थळ तयार करून दिले आहे. येथे अनेक मंदिरांचे नवनिर्माण करून तसेच श्री नागेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारा सह परिसराचा कायापालट करून त्यांनी या परिसराला आगळे वेगळे स्थान निर्माण करून दिले आहे. श्रीक्षेत्र नागेश्वर येथे भूपेशभाई पटेल यांनी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम पूर्ण केले असून या ठिकाणी नव्याने बंजारा समाजाचे आराध्य दैवत मोती माता मंदिर, श्री गणपती मंदिर, पार्वतीमाता, श्री शंभू महादेवाचे मंदिर, श्री गुरुदत्त, श्री ऋषि महाराज, श्री हनुमंत मूर्ती निर्माण करण्यात आले
