वेल्हाळे गावासाठी विवेकानंद संस्थेकडून दवंडी यंत्र उपलब्ध.




धुळे तालुक्यातील वेल्हाणे येथील स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेच्या युवा तरुणांनी विवेकानंद युवक बचत गट व छत्रपती युवक बचत गट यांच्या माध्यमातून गावात एक अनोखा उपक्रम राबवला आहे. त्यांनी गावाला इलेक्ट्रॉनिक स्वरूपाची दवंडी यंत्र उपलब्ध करून दिले. आज इंटरनेटचा जमाना असतानासुद्धा गावातील फक्त तरुण वर्ग हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडला गेलेला आहे पण बरेचसे गावकरी हे त्यापासून लांब आहेत मग गावात कोणत्याही प्रकारची घटना कार्यक्रम असल्यास दवंडी देण्याची जुनी प्रथा गावात अजूनही चालू आहे. स्वस्त धान्य दुकानात धान्य आली असल्याची दवंडी असो किंवा ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा असो किंवा वीज बिल भरण्यासाठी आलेली दवंडी असो अशाप्रकारच्या दवंडी गावांमध्ये आजही पिटवल्या जातात. पण दवंडी देणारा हा जुन्या काळाप्रमाणे पहाडी आवाजाचा नसल्यामुळे अनेकांपर्यंत ही दवंडी पोहोचत नाही. आणि अनेक लोक त्या लाभापासून वंचित राहतात हे लक्षात घेता स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्था वेल्हाणे यांनी आपल्या गावात इलेक्‍ट्रॉनिक स्वरूपाचे दवंडी यंत्र असावे ही संकल्पना मांडली की ज्यात एकदा सुस्पष्ट आवाजात दवंडी रेकॉर्ड करून दिली की ती फक्त चौकाचौकात जाऊन बटन दाबल्यावर गावातील प्रत्येक माणसापर्यंत पोहचू शकेल. या उद्देशाने गावाला दवंडी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले या नवीन यंत्रात माइक सिस्टम, रेकॉर्डिंग, म्युझिक सिस्टम, यूएसबी सिस्टम असं सर्व प्रकारचे अद्ययावत सुविधा असलेलं हे यंत्र आहे. या यंत्राचे लोकार्पण युवा सप्ताहाच्या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष जयदीप पवार, बचत गटाचे अध्यक्ष आनंदा मराठे, सचिव प्रवीण बोरसे, उपाध्यक्ष अनिल शिंदे, सहसचिव अविनाश वाघ, प्रदीप मोरे, शांताराम पाटोळे,दिपा अण्णा, प्रवीण मराठे मंगेश गोपाळ यांच्या उपस्थित करण्यात आले. तरुणांच्या या उपक्रमाचे ग्रामस्थांकडून खूप कौतुक करण्यात येत आहे.

Mahendra Rajput

या ऑनलाईन पोर्टलचे मुख्य संपादक: श्री. महेंद्रसिंह राजपूत. सदर ऑनलाईन वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकूराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र) (R.N.I. No. MAH/MAR/2014/55604)

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने